मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. संजय राऊतांनी ट्विट करून राज ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत. वाद वादळातही मित्रत्वाचे नाते टिकून राहिले..असे म्हणत संजय राऊत यांनी ट्विट केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाद वादळातही मित्रत्वाचे नाते टिकून राहिले.. असे व्यंगचित्रकार..रसिक मनाचे राजकारणी श्री. राज ठाकरे @RajThackeray यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. जय महाराष्ट्र... असं ट्विट करत शुभेच्छा दिल्या आहेत. ('सुदामाचे राजधन'; बाळा नांदगावकरांकडून राज ठाकरेंना शुभेच्छा) 



राजकीय व्यक्तींमध्ये विचारांनी मतमतांतर असू शकते. पण अनेकदा ही मंडळी मित्रत्वाचे नाते ठेवतात हे देखील समोर आलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. 



१४ तारखेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस असतो, पण यावर्षी कार्यकर्त्यांनी वाढदिवस साजरा करू नये, असे आदेश राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. 'वाढदिवसाच्या दिवशी अनेक कार्यकर्ते मला भेटायला येतात, पण यंदाची परिस्थिती वेगळी आहे. सगळीकडे चिंतेचं वातावरण आहे. या वातावरणात वाढदिवस साजरा करणं उचित नाही. त्यामुळे कोणीही मला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला येऊ नये. तुम्ही जिकडे असाल, तिथेच जनतेला मदत करा. याच माझ्यासाठी शुभेच्छा असतील,' असं परिपत्रक राज ठाकरेंनी काढलं आहे.