मुंबई : संजय राऊत यांनी धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं की, 'काही गोष्टी खासगी असतात, कौटुंबिक असतात, अशा गोष्टी त्याच पद्धतीने सोडवल्या गेल्या पाहिजे. कौटुंबिक गोष्टीत राजकीय भूमिका आणणे योग्य नाही. बाळासाहेबांनी काही भूमिका ठरवल्या होत्या. धनंजय मुंडे यांचा विषय त्यांच्यावरच सोडला पाहिजे.'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रवादीचेच नेते नाही तर महाविकास आघाडीचे नेते टार्गेट केले जात आहे. चरित्र हनन हे होतच राहणार, हे असे केल्याने महाविकास आघाडी धोक्यात येईल हा भ्रम आहे.असं देखील संजय राऊत यांनी म्हटलं आहे.


'केंद्र सरकारला वाटते शतकरी आडमुठे आहे एकमेकांवर ढकलून प्रश्न सुटणार नाही. मी सरकारला पाऊल मागे घ्या असे म्हणत नाही. मात्र सरकारने तडजोडीची, समन्वयाची भूमिका घेतली पाहिजे. राजकारणात कुणीही कायमचा शत्रू आणि मित्र नसेतो. भाजप सोबत आम्ही पंचवीस वर्ष काम केले आहे. आम्ही त्यांना शत्रू मानायला तयार नाही. जरी विरोधी पक्षात असले तरी ते आमचेच सहकारी आहे.'


त्यांनी गोड बोलावे, गोड हसावे, सरकारच्या बाबतीत गोड विचार करावा आणि महाराष्ट्राला गोड दिवस आणावे ह्याच शुभेच्छा. असं देखील राऊत यांनी म्हटलं आहे.