सागर कुलकर्णी, झी मीडिया : राज्याच्या राजकारणातील आताची सर्वात मोठी बातमी. शिंदे-फडणवीस सरकराने (Shinde-Fadanvis Government) महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) महत्वाच्या नेत्यांची सुरक्षा काढली आहे.  छगन भुजबळ, नाना पटोले,  वरूण देसाई, जंयत पाटील, सतेज पाटील, विजय वड्डेटेवार, बाळासेहब थोरात, संजय राऊत, धनंजय मुंडे, नवाब मलिक यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असं असताना मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांच्या सुरक्षेत मात्र वाढ करण्यात आली आहे. तर जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांची सुरक्षा जैसे थे ठेवण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) आणि माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची सुरक्षा कायम ठेवण्यात आली आहे. 


राज्यातील गृहविभागाची एक बैठक काही दिवसांपूर्वी झाली होती. गुप्तचर यंत्रणांच्या फिडबॅकनंतर या बैठकीत मविआतल्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं बोललं जातं आहे. राज्यात सरकार बदललं की आधीच्या सरकारमधील नेत्यांची सुरक्षा कमी करण्याचे प्रकार याआधीही झाले आहेत. 


एमसीए निवडणूकीत एकत्र
नुकत्याच झालेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत जितेंद्र आव्हाड, मिलिंद नार्वेकर आणि भाजप नेते आशिष शेलार एकत्र दिसले होते. मिलिंद नार्वेकर यांना आधी एक्स कॅटेगरीची सुरक्षा होती, आता त्यांना वाय प्लस सुरक्षा देण्यात आली आहे.