शीना बोरा हत्याकांड : राकेश मारियांच्या पुस्तकात खळबळजनक आरोप

तत्कालिन सहआयुक्त देवेन भारती यांनी तपशील दडवल्याचा आरोप 

Updated: Feb 18, 2020, 02:41 PM IST

मुंबई : शीना बोरा हत्याकांड प्रकरणात तत्कालिन सहआयुक्त देवेन भारती यांनी तपशील दडवल्याचा आरोप माजी पोलीस आयुक्त मारियांनी केलाय. देवेन भारती यांनी बहुचर्चित शीना बोरा हत्याकांडाशी संबंधीत आरोपी पीटर, इंद्राणी मुखर्जी यांच्याबाबत महत्त्वाची माहिती दडवणे, हे क्लेषकारक होते असा दावा मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी त्यांच्या ‘लेट मी से इट नाऊ’या पुस्तकातील एका प्रकरणात केला आहे. 

इंद्राणीची कन्या शीना हिच्या हत्येची उकल खार पोलिसांनी केली. तेव्हा मारिया पोलीस आयुक्त होते. या हत्येत पीटर, इंद्राणी यांची नावे संशयीत म्हणून पुढे येऊ लागल्यानंतर आयुक्त मारिया स्वत: खार पोलीस ठाण्यात येऊन पीटरची चौकशी केली होती. 

त्यामुळे मारिया यांना या प्रकरणात इतकी उत्सुकता का, असा प्रश्न निर्माण झाला. या घडामोडींवर एक स्वतंत्र प्रकरण मरिया यांनी आपल्या पुस्तकात लिहिले आहे.