नारायण राणेंवर शिवसेनेची जोरदार टीका
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणेंनी शिवसेनेच्या नावाने शिमगा करण्यापेक्षा त्यांनी स्वत:चे अस्तित्व जपावं आणि ज्या पक्षात त्यांचा अपमान झाला त्या पक्षात त्यांचा मुलगा आमदार म्हणून कसं काय चालतो, असा सवाल शिवसेनेने विचारलाय.
मुंबई : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणेंनी शिवसेनेच्या नावाने शिमगा करण्यापेक्षा त्यांनी स्वत:चे अस्तित्व जपावं आणि ज्या पक्षात त्यांचा अपमान झाला त्या पक्षात त्यांचा मुलगा आमदार म्हणून कसं काय चालतो, असा सवाल शिवसेनेने विचारलाय.
राणेंचा हा कसला स्वाभिमान असा प्रश्न शिवसेना आमदार अनिल परब यांनी उपस्थित करत राजकीय धुळवडीत टीकेची झोड उठवली. बांद्रा इथं महापौर विश्वनाथ महाडेश्वर, आमदार अनिल परब, शिवसेना नगरसेवक आणि शिवसैनिकांनी पर्यावरणपूरक होळी साजरी केली. त्यावेळी शिवसेनेने नारायण राणेंचा खरपूस समाचार घेतला.
मुंबईचे प्रथम नागरिक महापौर विश्वनाथ महाडेश्वर खेळणार इकोफ्रेंडली धुळवड साजरी केली. त्यांच्यासोबत शिवसेनेचे आमदार आणि प्रवक्ते अनिल परब आणि शिवसेना नगरसेवकदेखील इकोफ्रेंडली धुळवडीत सामील झाले. मुंबईकरांनीही अशीच पर्यावरण पूरक धुळवड साजरी करावी, असं आवाहन यावेळी महापौरांनी केलं.