Shivsena BJP Wokers Union: मुंबईत उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला आहे. वांद्रे येथील हॉटेल ताज लॅण्डस एन्ड येथे शिवसेना UBT प्रणित भारतीय कामगार सेनेने धडक दिली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार अनिल परबही तिथे दाखल झाले आहेत. यानंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे.
हॉटेल ताज लँड्स एन्ड इथे शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेची मान्यताप्राप्त युनियन आहे. याच ठिकाणी भाजपच्या अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाची युनियन स्थापन करण्यात आली, यावरून हा वाद निर्माण झाला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते बुधवारी भाजपच्या कामगार संघटनेच्या युनियन फलकाचे अनावरण करण्यात आले होते.
कामगार नसतानाही जबरदस्तीने युनियन स्थापन केली जात असल्याचा ठाकरेंच्या भारतीय कामगार सेनेचा आरोप आहे. यानंतर पोलिसांनी सर्वांना गेटवर अडवलं आहे. शिवसैनिकांकडून यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. यानंतर अनिल परबही तिथे पोहोचले आणि आतमध्ये जाण्यापासून अडवलं जात असल्याबद्दल जाब विचारला. मुंबई पालिका जिंकता येत नाही म्हणून अशाप्रकारे त्रास दिला जात आहे असा आरोप त्यांनी केला आहे.
"शिवसेनेची भारतीय कामगार सेनेची युनिअन आहे. भारतीय कामगार सेनेने आतापर्यंत मुंबईतील, महाराष्ट्रातील सर्व सेवा उद्योगांमध्ये बाळासाहेबांच्या धोरणानुसार कोणालाही त्रास होईल असं काम केलेलं नाही. पण आमच्या सहाकार्याच्या धोरणाचा व्यवस्थापनाकडून गैरफायदा घेतला जात असल्याचं हल्ली दिसत आहे. दोन दिवसांपासून अचानक सगळ्या कामगारांवर व्यवस्थापन दबाव आणत आहे. आणि नवीन भाजपाची युनिअन आहे त्याच्या सदस्यसत्वासाठी दबाव आणत आहे. कामगार आमच्या दबाब आणि जबरदस्ती केली जात असल्याचं सांगत आहे. भाजपाचे फॉर्म भरले नाहीत तर काढू अशी धमकी दिली जात आहे," असा आरोप अनिल परब यांनी केला आहे.
शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे.
...Read More
LIVE|
WI
(44 ov) 114/7 (75 ov) 205
|
VS |
NZ
278/9(74.4 ov)
|
| Full Scorecard → | ||
|
SA
(20 ov) 213/4
|
VS |
IND
162(19.1 ov)
|
| South Africa beat India by 51 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
PHI
(20 ov) 182/5
|
VS |
INA
104(18.5 ov)
|
| Philippines beat Indonesia by 78 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
SIN
(20 ov) 156/8
|
VS |
THA
152/9(20 ov)
|
| Singapore beat Thailand by 4 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.