हृदयद्रावक! नातवाने आरेच्या जंगलात सोडलेल्या आजीचा मृत्यू, शेवटच्या क्षणीही...

आजीच्या आजारपणाला कंटाळलेल्या नातवाने तिला आरेच्या जंगलात सोडलं. याच आजीचा करुण अंत झालाय... 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Oct 16, 2025, 09:13 AM IST
हृदयद्रावक! नातवाने आरेच्या जंगलात सोडलेल्या आजीचा मृत्यू, शेवटच्या क्षणीही...
Aarey Jungle Yashoda Gaikwad

अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही बातमी तुमचं मन हेलावून टाकेल यात शंका नाही. एका काळोख्या रात्री कॅन्सरग्रस्त आजीला नातवाने आरेच्या जंगलात सोडून दिलं. ही घटना वाऱ्यासारखी पसरली. अखेर पोलिसांनी आजीला रुग्णालयात नेवून तिचा जीव वाचवला. यानंतर कृतघ्न नातवाविरोधात सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. पोलिसांनी नातवाला आणि त्याच्या तीन मित्रांची कान उघाडणी केली आहे. त्या घटनेतील आजीचा करुण अंत झाला आहे. वयाच्या 68 व्या वर्षी आजीने जगाचा निरोप घेतला आहे. 

Add Zee News as a Preferred Source

या घटनेला तीनहून अधिक महिने उलटून गेले आहेत. आजीला उत्तनमधील आश्रमात दाखल करण्यात आलं होतं. आजीने जगाचा निरोप घेतला आहे पण तिने जाता जाताही नातवाला आशीर्वाद दिला आहे.  68 वर्षीय यशोदा गायकवाड यांना 33 वर्षीय नातवाने आरेच्या जंगलात सोडलं होतं. नातवाला आजींच्या उपचाराचा खर्च करणं परवड नव्हतं. त्यामुळे त्याने आजीला जंगलात सोडल्याची माहिती समोर आली होती. 

कोण आहे ही आजी?
यशोदा गायकवाड या 60 ते 70 वर्षांच्या वृद्ध महिल आहेत. त्यांना त्वचेचा कर्करोग (स्किन कॅन्सर) आहे. त्या कांदिवलीतील पोईसर परिसरात त्यांच्या नातू सागर शेवाळे याच्यासोबत राहतात. त्यांच्या मालकीची एक भाडेकरू दुकान आहे, ज्यामुळे त्यांचा उपचार खर्च (महिन्याला १० ते १५ हजार रुपये) भागवता येत असे. 

'आरे आजी' प्रकरण काय आहे?
23 जून 2025 रोजी मुंबईच्या गोरेगावमधील आरे कॉलनीच्या जंगलात कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ यशोदा गायकवाड या आजी सापडल्या. स्थानिकांनी पोलिसांना कळवले आणि त्यांना कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी म्हणून व्हायरल झाली.

नातू सागर शेवाळे याने काय केले?
सुरुवातीला सागरने सांगितले की, आजी स्वतःहून घरातून निघून गेल्या. मात्र, सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसले की, त्याने आजींना रिक्षातून आरे कॉलनीत नेले आणि कचऱ्याजवळ सोडून दिले. कर्करोगामुळे आजी बोलू शकत नव्हत्या, तरीही त्यांनी मदत मागितली असावी. पोलिसांनी सागरवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

About the Author

Dakshata Thasale

दक्षता ठसाळे-घोसाळकर या 'झी 24 तास डिजिटल'मध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत आहे. यांना पत्रकारिता या क्षेत्रातील 14 वर्षांचा अनुभव आहे. 'प्रहार' आणि 'लोकमत' या आघाडीच्या वृत्तसंस्था आणि 'टीव्ही 9' आणि 'न्यूज एक्सप्रेस मराठी' या आघाडीच्या वृत्तवाहिनीचा अनुभव घेतल्यानंतर डिजीटल क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. 'India.com मराठी' या डिजीटल वेबसाईटमध्ये काम केल्यानंतर 'महाराष्ट्र टाईम्स' च्या ऑनलाईन वेबसाईटसाठी काम केलं. यानंतर 'झी 24 तास डिजीटल'मध्ये विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं आहे. यामध्ये Lifestyle, आरोग्य, मनोरंजन यामधील बातम्यांमध्ये हातखंडा असून राज्यस्तरीय घडामोडी, गुन्हे आणि राजकीय घडामोडींमध्ये सर्वात मोठं योगदान आहे. पालकत्व, गर्भधारणा आणि पाककृती यासंदर्भात लेख लिहण्यास विशेष रुची आहे. 

...Read More