मुंबईकरांना स्ट्रॉबेरीसाठी महाबळेश्वरला जायची गरज नाही कारण...

अनुभवनं प्रायोगिक तत्त्वावर केलेला हा प्रयत्न अत्यंत यशस्वी ठरलाय

Updated: Jan 28, 2020, 07:07 PM IST
मुंबईकरांना स्ट्रॉबेरीसाठी महाबळेश्वरला जायची गरज नाही कारण...  title=

चंद्रशेखर भुयार, झी २४ तास, बदलापूर : अंबरनाथ तालुक्यात स्ट्रॉबेरी... ऐकून नवल वाटेल मात्र हे खरे आहे. अनुभव मांजरेकर या प्रयोगशील शेतकऱ्याने आपल्या शेतात स्ट्रॉबेरी लागवडीचा प्रयोग यशस्वी करून दाखवलाय. 

लालचुटूक रसाळ स्ट्रॉबेरी पाहून तुम्हाला नक्कीच महाबळेश्वरची आठवण होईल... मात्र ही स्ट्रॉबेरी महाबळेश्वरमधील नाही तर ही स्ट्रॉबेरी आहे अंबरनाथ तालुक्यातील बेंडशीळ या गावातील... 

बदलापूरचे प्रयोगशील शेतकरी अनुभव मांजरेकर यांनी अडीच गुंठय़ांवर स्ट्रॉबेरीची लागवड केलीय. अनुभवनं प्रायोगिक तत्त्वावर केलेला हा प्रयत्न अत्यंत यशस्वी ठरलाय.

विशेष म्हणजे, अनुभवची स्ट्रॉबेरीची शेती संपूर्ण सेंद्रीय पद्धतीची आहे. कोकणातील जमीन आणि वातावरण स्ट्रॉबेरीसाठी पोषक असल्याचं अनुभवनं प्रयोगातून सिद्ध केलंय. 

सध्या पंचक्रोशीत अनुभवची ही स्ट्रॉबेरीची शेती चर्चेचा विषय ठरलीय. सेंद्रीय असल्यानं बाजारातही त्याच्या स्ट्रॉबेरीला चांगला भाव मिळतोय. त्याचा हो प्रयोग पारंपरिक शेतीला नवीन दिशा देणारा ठरलाय.