)
Mumbai Attack Investigation : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशवादी हल्यानंतर सुरक्षा एजन्सी अधिक सर्तक झाले असून कैद असलेल्या दशतवाद्यांची ते कसून चौकशी करत आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादी तहव्वुर हुसेन राणाची कसून चौकशी सुरु आहे. मुंबई गुन्हे शाखेचे अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशी दरम्यान तहव्वुर हुसेन राणाने धक्कादायक खुलासा केला आहे. या चौकशी दरम्यान राणाने मुंबई 26/11 हल्ल्याबद्दल मोठा दावा केला आहे. त्याने चौकशी दरम्यान मुंबई 26/11 दहशतवादी हल्ल्याशी काहीही संबंध नाही. त्याने या हल्ल्यापासून हात झटकले आहेत. तर त्याने या हल्ल्यामागे कोणाचा हात आहे हेदेखील चौकशी दरम्यान सांगितलं आहे. त्याने मुंबई गुन्हे शाखेचे अधिकाऱ्यांना सांगितलं की, मुंबई 26/11 दहशतवादी हल्ल्यामागे माझा बालपणीचा मित्र डेव्हिड हेडली आहे. हल्ल्याच्या संपूर्ण नियोजनात आणि तयारीत आपला कोणताही सहभाग नसल्याचा दावा राणाने केला. (Terrorist Rana big revelation about 26 11 Mumbai attacks david headley Mumbai Attack Investigation news in Marathi)
खरं तर, दहशतवादी राणाने चौकशीदरम्यान असा दावा केला आहे की तो दिल्ली आणि मुंबई व्यतिरिक्त केरळलाही गेला होता. जेव्हा एजन्सींनी त्याला केरळला जाण्याचे कारण विचारले तेव्हा त्याने सांगितले की तो त्याच्या काही ओळखीच्या लोकांना भेटण्यासाठी गेला होता. राणाने त्याच्या केरळस्थित ओळखीच्या व्यक्तीचे नाव आणि पत्ताही तपास यंत्रणांना दिला आहे. आता गुन्हे शाखेने राणाच्या या माहितीची पडताळणी करत आहे. तर लवकरच एक पथक केरळला रवाना होणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.
एनआयए आणि एनएसजीच्या पथकांनी राणाला लॉस एंजेलिसहून एका खास विमानाने भारतात आणले. राणाने त्याचे प्रत्यार्पण रोखण्यासाठी अमेरिकन न्यायालयांमध्ये अनेक प्रयत्न केले होते. मात्र सर्व प्रयत्न अयशस्वी झाले. भारताच्या परराष्ट्र आणि गृह मंत्रालयांनी अमेरिकन अधिकाऱ्यांच्या सहकार्याने ही प्रक्रिया पार पाडून मोठं यश मिळवलं आहे.
तहव्वुर राणा यांच्यावर 26/11 हल्ल्याच्या कटात लष्कर-ए-तैयबासोबत सहकार्याने काम केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहे. 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या या हल्ल्यांनी देशाला हादरवून टाकले. जेव्हा ताज हॉटेल, ओबेरॉय ट्रायडंट, छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि नरिमन हाऊस सारख्या ठिकाणी दहशतवाद्यांनी लक्ष्य केल्यानंतर जगभरात एकच खळबळ माजली होती. एनआयएने राणाविरुद्ध वर्षानुवर्षे पुरावे गोळा केले आणि आता त्याच्या भूमिकेची सखोल चौकशी करण्यात येत आहे.