)
प्रताप सरनाईक यांनी आपल्या नातवासाठी टेस्ला कार गिफ्ट केली आहे. एलोन मस्कच्या कंपनीने भारतात पहिलंच शोरुम सुरु केलं. याच शोरुममधून प्रताप सरनाईक यांनी पहिलीच कार खरेदी केली आहे. महत्त्वाचं म्हणजे प्रताप नाईक यांनी एवढी महागडी गाडी आपल्या नातवाला गिफ्ट केल्यामुळे त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. अशातच एका अभिनेत्याने प्रताप सरनाईक यांना थेट सवाल केला आहे की, 'एवढा पैसा कुठून आला काका?'
'त्या नातवासाठी घेतलेल्या नवीन Tesla रूपी खेळण्याची किंमत किती आहे हो काका? आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या, कर भरणाऱ्या तरीही खड्ड्यांमधून, आमच्या कष्टाच्या पैशांतून घेतलेली वाहनं चालवावी लागणाऱ्या आमच्यासारख्या नागरिकांच्या जीवाची किंमत किती आहे हो काका? एवढा पैसा कुठून आला काका?'
Tesla ही कार खरेदी केल्यानंतर प्रताप सरनाईक यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की, 'मी ही कार घेऊन आनंदी झालो आहे. ही कार मी माझ्या नातवाला भेट देतोय. ही कार घेऊन त्याला शाळेत पाठवलं जाईल, त्यावेळी इतर मुलं ही कार पाहतील. इतर मुलांमध्ये जनजागृती होईल. जे लोक कार खरेदी करू शकतात ते अशा इलेक्ट्रिक कार्सना प्राधान्य देतील'
आस्ताद काळे यांनी आणखी कोणते प्रश्न विचारले?
आस्ताद काळे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये आणखी दोन प्रश्न विचारले: "एवढा पैसा आला कुठून, काका?" "तुमच्या लाडक्या नातवाला ते खेळणं घोडबंदर रस्त्यावरून न्यायला सांगा ना. बाकी लाल दिव्यांचा ताफा बरोबर न घेता."
टेस्ला कार खरेदीची किंमत किती आहे?
टेस्ला कारच्या मॉडेलनुसार भारतात त्याची किंमत साधारणपणे ३५ लाख ते १ कोटी रुपये किंवा त्याहून अधिक असू शकते.
या प्रकरणात रस्त्यांच्या स्थितीचा मुद्दा का उपस्थित झाला?
आस्ताद काळे यांनी आपल्या पोस्टमध्ये महाराष्ट्रातील रस्त्यांच्या खराब स्थितीवर आणि खड्ड्यांमुळे सामान्य नागरिकांना होणाऱ्या त्रासावर प्रकाश टाकला. त्यांनी सरनाईक यांच्या टेस्ला कार खरेदीशी जोडून रस्त्यांच्या दुर्दशेकडे लक्ष वेधले आणि लोकप्रतिनिधींच्या जबाबदारीवर प्रश्न उपस्थित केले.