Maharashtra Government  Jobs 2023 : सरकारी नोकरीची आस लावून बसलेल्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे.  राज्यात सरकारी सेवेत 75 हजार रिक्त पदांची भरती सरकारने जाहीर केली आहे. मात्र, या भरतीची डेडलाईन हुकण्याची चिन्हं आहेत. 15 ऑगस्ट 2023 पर्यंत ही भरती होणार होती. मात्र, प्रशासकीय पातळीवर संथ गतीने हालचाली सुरू असल्याने ही डेडलाईन हुकणार अशी स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे सरकारी नोकरीच्या प्रतिक्षेत असणाऱ्यांना आणखी वाट पहावी लागणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात विविध विभागांची दीड लाख पदं रिक्त आहेत. एमपीएससीच्या कक्षेबाहेरील गट ब, गट क, गड ड भरतीसाठी टीसीएस आणि IBPS या कंपन्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 18 एप्रिलच्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारच्या आढाव्यात केवळ साडेसहा हजार पदांवर भरती झाल्याचं उघड झाले आहे. 


सोलापुरात तरुणांना नोकरीची संधी 


सोलापुरात तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध होणारेय. महानगरपालिकेतील 32 संवर्गातील 340 रिक्त पदं भरण्यासाठी खासगी कंपनीसोबत करार झालाय. भरती प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या रिक्त पदांसाठीची परीक्षा होण्याची शक्यता आहे.


राज्यातल्या शिक्षक पदभरतीचा मार्ग मोकळा


राज्यातल्या शिक्षक पदभरतीचा मार्ग आता मोकळा होणार आहे. कारण शिक्षकांची संचमान्यता 15 मे रोजी अंतिम केली जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या आधारकार्डवरची माहिती जुळत नसल्याने संचमान्यता रखडली होती. तुकडी आणि विद्यार्थीसंख्या यांच्या प्रमाणात शिक्षकांची संख्या म्हणजे संचमान्यता. संचमान्यतेचं शाळानिहाय वितरण 20 मेपर्यंत होईल. तर शिक्षकभरतीच्या पोर्टलवर 15 जुलैपर्यंत रिक्त पदे नोंदवावी लागणार आहेत.. त्यानंतर मग शिक्षकभरतीची प्रक्रिया सुरु होईल.


पोलीस भरतीत गैरप्रकार


मुंबईत पोलीस भरतीत गैरप्रकार उघडकीस आला आहे. इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करून पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत कॉपी करताना चार विद्यार्थी आढळून आले आहेत. त्यांच्याविरोधात मुंबईतील भांडुप, गोरेगाव, कस्तुरबा मार्ग आणि मेघवाडी पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मुंबईतील पोलीस भरतीमध्ये आरोपी परीक्षार्थीनी डेबिट कार्डसदृश बोलण्याचे यंत्र, इअरबड, सिम कार्ड असलेले पेन अशा उपकरणांचा वापर केला. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे कॉपी रोखण्यात यश आल आहे.