Top 7 Headlines : आजच्या महत्वाच्या ७ बातम्या | ९ डिसेंबर २०२१

महत्वाच्या बातम्या ज्या थेट तुमच्यावर परिणाम करणार 

Updated: Dec 9, 2021, 07:19 AM IST
Top 7 Headlines : आजच्या महत्वाच्या ७ बातम्या | ९ डिसेंबर २०२१

मुंबई : आज 9 डिसेंबर 2021. आजच्या 7 महत्वाच्या बातम्या. लोकल ते ग्लोबल अशा सगळ्याच बातम्या. ज्या सामान्यांवर करणार थेट परिणाम 

टॉप ७ न्यूज 

१. तामिळनाडूतल्या कुन्नुरमध्ये लष्कराच्या हेलिकॉप्टर अपघातात CDS बिपिन रावत यांच्यासह १३ जणांचा मृत्यू झालाय. यात त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांचाही समावेश आहे. तर ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांच्यावर वेलिंग्टन इथल्या लष्करी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, शुक्रवारी रावत यांचं पार्थिव दिल्लीत आणण्यात येणाराय.. सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत त्यांचं अंत्यदर्शन घेता येणाराय... त्यानंतर कामराज मार्ग ते ब्रार स्क्वेअर दफनभूमी अशी त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. 

२.कोरोनाचा नवा ओमायक्रॉन व्हेरिएंट आता ५७ राष्ट्रांमध्ये पसरला आहे. त्याचा प्रसाराबरोबरच आता ओमायक्रॉन बाधित रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याचं प्रमाणही वाढलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेने ही माहिती दिली आहे.जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या साप्ताहिक महामारीविषयक अहवालात म्हटलं आहे की, या विषाणूच्या संसर्गाची तीव्रता समजून घेण्यासाठी अधिक तपशीलाची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे लसीमुळे निर्माण झालेली प्रतिकारशक्ती या विषाणूप्रकाराच्या म्यूटेशन्समुळे कमी होत नाही ना, याविषयीचा अभ्यास करण्यासाठीही थोडा वेळ लागेल.

३. राज्यातील ओमायक्रॉन व्हेरियंटचा पहिला रुग्ण बरा झालाय. डोंबिवलीत सापडलेल्या या रुग्णाला आज डिस्चार्ज देण्यात आला. योगायोग म्हणजे या रुग्णाला वाढदिवशीच कोविड निगेटिव्ह झाल्याचं गिफ्ट मिळालंय. कोरोना पॉझिटीव्ह आढळल्यानंतर त्याला 27 तारखेला रुग्णालयात दाखल केलं होतं.. 

४. वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना दिलासा एमपीएससीच्या उमेदवारांना मोठा दिलासा...एक वाढीव संधी देण्याचा राज्य सरकारचा निर्णय.. कोरोनामुळे रखडलीहोती भरती प्रकीया

५. राज्यात इंजेक्शन फ्री लस लवकरच...28 दिवसांच्या अंतराने तीन डोस घ्यावे लागणार...प्राथमिक टप्प्यात नाशिक आणि जळगावची निवड...

६. भारताच्या वनडे क्रिकेट टीमचं नेतृत्व रोहित शर्माकडे... तर विराट कोहली केवळ टेस्ट टीमचा कॅप्टन... दक्षिण आफ्रिका दौ-यासाठी संघ जाहीर

७. कतरिना आणि विकी कौशलचं आज बरवाड्यातल्या सिक्स सेन्स हॉटेलमध्ये शाही लग्न, बॉलिवूड सेलिब्रिटींची लग्नासाठी हजेरी