)
महाराष्ट्रात ऑपरेशन टायगरनंतर जर कोणाची चर्चा होत असेल तर ते आहेत आयुक्त तुकाराम मुंढे. अन्न व औषध प्रशासन आयुक्तपदाची जबाबदारी घेतल्यानंतर महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात त्यांच्या नावाने व्यापाऱ्यांना घाम फुटतोय. लोकांच्या जीवासोबत खेळणाऱ्या आणि भेसळ करणाऱ्यांना त्यांनी चांगलाच धडा शिकवला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये त्यांनी अनेक ठिकाणी धडी मारल्या आहेत. एवढंच नाही असंख्य कंपन्या, हॉटेल्सवर कडक कारवाई केली आहे. त्यांच्या नावाने लोकांमध्ये दहशत पसरली आहे. तुकाराम मुंढे येणार हे कळतात, बाजारापेठांमधील दुकानं, हॉटेल्स बंद करण्यात येतात. अशा या तुकाराम मुंढे यांना एका मराठी वृत्त वाहिनीमधील मुलाखत विचारण्यात आलं की, तुम्हाला नायक चित्रपटातील अनिल कपूर यांच्यासारख एका दिवसासाठी मुख्यमंत्री केल्यास काय कराल आणि अमर अधिकार दिलं तर काय कराल? यावर त्यांनी त्यांच्या शैलीत आणि बेधडक उत्तर दिलं.
या प्रश्नावर आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले की, मी हिंदी आणि इंग्रजी चित्रपट बघतो. नायक चित्रपटतही बघितला आहे. लोकशाहीमध्ये असे अमर अधिकार कोणालाही नसतात. मी एक शासकीय कर्मचारी म्हणून नेहमी सांगत असतो. आपलं काम हे शासकीय कर्मचारी म्हणून समाजाला वरच्या स्तरावर नेण्याचं आहे. मार्गदर्शन करणे, ताकद देणे आहे, समाज जेवढा विकसित होईल, तेवढा आपला देश आणि व्यक्ती विकसित होतो.
तुकाराम मुढे पुढे म्हणाले की, तसंच मला कोणत्याही क्षेत्रात रोल दिला तर ते प्रत्येक दिवशी आणि पुढचा एक इंच कसा वाढेल, हे करताना पूर्णपणे पारदर्शक असणार आहे. जो गोल आणि जो रोल असेल, ते काम झालं पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.
ते पुढे म्हणाले की, मी शासकीय नोकर असून मला माझ्या मर्यादा माहिती आहे. लोक मला नायक म्हणत असले तर मी त्यांचे आभार मानतो, ते मी चांगल्या हेतूने स्वीकार करतो.