Orange Gate Marine Drive Tunnel: मुंबई आणि उपनगरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रशासनाकडून अनेक उपाययोजना हाती घेण्यात येत आहेत. भुयारी रस्ते, मेट्रो तर मुंबई लोकलही अपग्रेड करण्यात येत आहेत. वाढती वाहतूक मागणी आणि वाहतुकीच्या परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाने MMRDA ने ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह या मुंबई शहरातील भूमिगत रस्त्याचे बांधकाम हाती घेतले आहे. (Orange Gate-Marine Drive Double Tunnel Project)
आज बुधवारी ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह प्रकल्पातील टीबीएम लॉन्चिंगचा महत्त्वाचा टप्पा पार पडणार आहे. त्याआधी काय आहे हा प्रकल्प, जाणून घेऊयात सविस्तर. ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह भूमिगत रस्त्याच्या प्रकल्पाचा खर्च 8056 कोटी इतका असून पूर्णत्वाचा कालावधी 54 महिने असणार आहे. तसंच, या प्रकल्पाची एकूण लांबी 9.96 किमी आहे. यामध्ये जवळपास 7 किमी भुयारी मार्ग आहे.
प्रत्येक बोगद्यात 3.2 मीटर रुंदीचे 2 पदरी रस्ते, 1 पदरी आपत्कालीन रस्ता असेल. तसंच, दोन्ही बोगद्यांमध्ये वेगमर्यादा 80 किमी/ तास असेल. हा बोगदा कोस्टल रोड आणि अटल सेतूसारख्या पायाभूत सुविधा प्रकल्पांशी जोडला जाणार आहे. तसंच, हा भारतातील पहिला शहरी बोगदा प्रकल्प असून तो घनदाट लोकवस्ती असलेल्या भागाखालून जाईल. उदा. मध्य, पश्चिम रेल्वे आणि मुंबई मेट्रो लाईन 3 (अॅक्वा लाइन) च्या 50 मी खालून जातो.
मुंबईतील पूर्व-पश्चिम उपनगरे आणि नवी मुंबई या भुयारी मार्गाद्वारे जोडली जाणार आहे. त्यामुळं प्रवासाचा वेळ 15-20 मिनिटांनी कमी होईल. तसंच, इंधनाची बचतदेखील होणार आहे. या बोगद्यामुळं ध्वनी आणि वायू प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.
उत्तर: मुंबईतील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी MMRDA ने ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह या मुंबई शहरातील भूमिगत रस्त्याचे (Underground Road) बांधकाम हाती घेतले आहे.
उत्तर: आज (बुधवारी) ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह प्रकल्पातील टीबीएम (TBM - Tunnel Boring Machine) लॉन्चिंगचा महत्त्वाचा टप्पा पार पडणार आहे.
उत्तर: हा बोगदा कोस्टल रोड आणि अटल सेतू (Mumbai Trans Harbour Link) सारख्या पायाभूत सुविधा प्रकल्पांशी जोडला जाणार आहे.
मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्रा टाइम डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि अर्थ (infrastructure) या विषयात विशेष रुची आहे. त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड. इन्फ्रास्ट्रक्चर आणि गुन्हे या बातम्यांमध्ये हातखंडा.
...Read More|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.