)
Uddhav Thackeray Dasara Melava 2025: मुंबईत आज दोन्ही शिवसेनेचा सामना पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि उपमुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडतोय. शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंची तोफ धडाडतेय तर गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये उपमुख्यमंत्री शिंदेंच्या भाषणाला लवकरच सुरुवात होईल. आगामी महापालिका आणि झेडपी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या दसरा मेळाव्याला विशेष महत्त्व आहे. या महापालिका निवडणुकांचं रणशिंग या मेळाव्यातून फुंकलं जात आहे. शिवाजी पार्कवरील दसरा मेळव्यातील भाषणातून उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंची शिवसेना तसेच महायुती सरकारवर जोरदार टीका केली. काय म्हणाले उद्धव ठाकरे? सविस्तर जाणून घेऊया.
गाढवावर किती शाली टाका. गाढव ते गाढवचं. अमित शहांचे जोडे वाहणारे हे गाढव असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंचे नाव न घेता केली. सगळीकडे चिखल झालाय याचे कारण कमळाबाई आहे. शेतकऱ्यांची हालत झालीय,त्याची चुणूक आपल्याला येईल. घरादारात चिखल घुसलाय. शेतकरी विचारतोय, आम्ही खायचं काय? जे काही करता येईल ते मराठवाड्यासाठी करुया, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
नेमके तुम्ही हिंदू म्हणून तर आहात का..तपासून घ्या.. क्रिकेटची तुलना युद्धासोबत करतो तो माणूस बेशरम आहे असे म्हणत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर टिका केली. ढोंगी घराणेशाही तुमची व आमची ठाकरेंची घराणेशाही आहे. भाजपची औलाद ही पगारी मतदार तयार करत आहे…स्वाभिमानी मतदार व्हायचे की पगारी मतदार व्हायचे ते ठरवा. एक फूल्ल व दोन हाफ यांनी दिल्लीत जावून मदत का नाही मागत, मते विकत घेण्यासाठी पैसे आहेत पण शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसे नाहीत. बिहारमध्ये सव्वा लाख कोटी जाहीर केले होते. महाराष्ट्रावर तुम्हाला सूड घ्यायचाय, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
सोनम वांगचुक यांच्याकडे बघायला तयार नव्हते, त्यांना आता रासुका खाली आत टाकले. तसंच जनसुरक्षा कायदा आहे. सोनम वांगचुक यांना अटक होणार असेल तर शरीफ यांचा केक खाणाऱ्यांचे काय करायला हवं. तीन वर्षे मणिपूर जळतंय व आता मोदी तिकडे गेले होते. वाटले तोडगा काढतील. तिथं भाषण केले..मणिपूरच्या जनतेच्या डोळ्यातलं पाणी नाही दिसले. भाजप म्हणजे अमिबा झालाय. कुणाशीही युती करतो, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. सर्व्हेमध्ये आपले सीएम दहाव्या नंबरवर आहेत. मंत्र्यांच्या आईच्या नावे डान्सबार काढले जातात. हा तुमचा कारभार.. मुंबईत बोटसेवा सुरू करा.आता भाजपवाले हिंदू मुस्लिम करू लागलेत, कारण निवडणुका येवू लागल्यायत, असेही ठाकरे यावेळी म्हणाले.
तुम्ही मुंबई जिंकाल तर ती अदानींना देवून टाकाल.
देशात धर्म कोणताही असू शकतो पण राष्ट्रधर्म एकच तो म्हणजे हिंदुस्थान ही शिवसेनाप्रमुखांची शिकवण आहे. यांनी मुंबई जिंकली तर खान महापौर होईल असे म्हणतात. पण यांनी मुंबई जिंकली तर अदानीला समर्पयामी करतील. ही विषारी फळ लागलेली पाहून 100 वर्षे झाल्यानंतर तुम्हाला समाधान आहे का? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला.
संज्ञा खड्ड्यात घाला व मदत करा. मी कोणताही निकष न लावता कर्जमुक्ती केली होती. तशी कर्जमाफी करा. 2017 ची कर्जमाफी अजून केली नाही. नियमित कर्जफेड करणाऱ्यांना पैसे दिले नाहीत. संघाचा दसरा मेळावा झाला. 100 वर्षे पूर्ण होतायत व नेमकी गांधी जयंती असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. पाकिस्तानला गेले म्हणून वांकचूक यांना अटक होणार असेल तर नवाज शरीफांचा केक खाणाऱ्या मोदींना काय केलं पाहीजे? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला.
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यावर पावसाचं सावट आहे. गेले काही दिवस मुंबईत पावसानं हजेरी लावलीय. या पावसामुळे शिवाजी पार्कात चिखलाचं साम्राज्य पसरलंय.. त्यामुळे ठाकरेंच्या मेळाव्याच्या तयारीत अडथळे निर्माण झालेत.. त्यामुळे नियोजित पद्धतीने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार का याकडं सा-यांचं लक्ष लागलं होतं.
मुंबईमध्ये दोन्ही शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडतोय. दोन्हीही सेनेकडून जयत तयारी करण्यात आली असून नाशिक मधून देखील शेकडो शिवसैनिक हे मुंबईला आलेयत. मात्र शिंदेंच्या शिवसेनेकडून साध्या पद्धतीने शिवसेना दसरा मेळावा करणार असल्याचं सांगण्यात आलं.दसरा मेळाव्याला गर्दी न करता शिवसैनिकांनी तालुकातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मदत करावी आणि हा मेळावा साजरा करावा असं आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्यानंतर आज साध्या पद्धतीने दसरा मेळावा साजरा करणार असल्याचं मंत्री दादा भुसे यांनी सांगितलं होतं.
उत्तर: उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (यूबीटी) चा मेळावा शिवाजी पार्क (शिवतीर्थ) येथे होत आहे, जेथे त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आणि महायुती सरकारवर जोरदार टीका केली. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मेळावा गोरेगावच्या नेस्को सेंटर येथे साध्या पद्धतीने होत असून, पावसाच्या धोका टाळण्यासाठी ठिकाण बदलले गेले.
उत्तर: गेल्या काही दिवसांत मुंबईत मुसळधार पाऊस पडल्याने शिवाजी पार्क परिसरात चिखल पसरले आणि तयारीत अडथळे आले. तरी मेळावा नियोजितपणे पार पडला, ज्यात ठाकरे यांनी निवडणूक रणशिंग फुंकले. शिंदे गटाने मात्र नेस्को येथे इनडोअर मेळावा घेऊन पावसापासून संरक्षण केले.
उत्तर: मंत्री दादा भुसे यांनी सांगितले की, शिंदे गटाचा मेळावा साध्या पद्धतीने होईल. एकनाथ शिंदे यांनी गर्दी ऐवजी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मदत करण्याचे आवाहन केले असून, नाशिकमधून शेकडो शिवसैनिक मुंबईत दाखल झाले तरी सोपी तयारी केली. हे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांवर लक्ष केंद्रित आहे.