'महाराष्ट्राचा रक्तरंजित इतिहास पण...', उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिला मंत्र; 'त्यांच्या उरात धडकी भरेपर्यंत....'

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी भाजपवर टिका केली. 

प्रविण दाभोळकर | Updated: Jan 23, 2026, 09:24 PM IST
'महाराष्ट्राचा रक्तरंजित इतिहास पण...', उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिला मंत्र; 'त्यांच्या उरात धडकी भरेपर्यंत....'
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray: बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीनिमित्त षण्मुखानंद हॉलमध्ये सोहळा संपन्न झाला. यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजपवर टिका केली. तसेच शिवसैनिकांना उर्जा दिली. काय म्हणाले उद्धव ठाकरे? सविस्तर जाणून घेऊया. 

Add Zee News as a Preferred Source

मला नाही वाटत असं कोणतं भाग्य इतक कोणत्या नेत्याच्या नशिबी असेल. आजपासून बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात झालंय. राज आणि माझं बालपण एकत्र गेलं. वादळाशी खेळत आम्ही मोठे झालोय. त्यामुळे वादळाशी कसं लढायचं हे आम्हाला कोणी शिकवायची गरज नाही. ज्याच्या खांद्यावर जबाबदारी असते, त्याला ते हाताळायचं कळतं. आजोबा म्हणजे जमदग्नीचा अवतार, वडीलही असे. याविरुद्ध मॉ. माझी मॉ शांतपणे घर संभाळत होती. आम्हा तीनही मुलांना बाहेर काय चाललंय याची झळ पोहोचू न देता, प्रबोधनकारांची सून, बाळासाहेबांची पत्नी अशा भूमिका ती निभावत होती. घरामध्ये आजोबा, नातवंड असे नाते होते. शाळेत मी हसतखेळत गेलो नाही. तेव्हा मी बाळासाहेबांचा आधार घ्यायचो. एक दिवस शाळेत नाही गेला तर काय होतंय असे ते म्हणायचे. ठाकरे नाव पुसायला अनेकजण आलेयत पण त्यांना ते शक्य नाही. अशा घराणेशाहीचा अभिमान आहे. हे भाग्य मला लाभलंय. त्यांना त्यांच्या वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते. गद्दारी हा विषय पुर्वापार आहे. गद्दारी झाली नसती तर महाराष्ट्राने जगाचा इतिहास बदलून टाकला असता. 

बाळासाहेबांनी मराठी माणसाला जगायचं कसं हे शिकवलं. हे नाही शिकलो तर या 2 व्यापाऱ्यांचा गुलाम म्हणून जगण येईल. गुलाम म्हणून जगणार नाही, अशी शपथ आम्ही घेतले पाहिजे. महाराष्ट्रासारखा रक्तरंजित इतिहास आहे. याला गद्दारीचा श्राप आहे. काय मिळवलंत? महापौरपद? मुंबईतले गड आजही शाबूत आहेत. आपल्याला जपणारं कोण आहे? वेळेवर धावून येणार कोण आहे? जीवाचा सौदा करणारा कोण आहे? याचा विचार आपण केला पाहिजे. 

गद्दारांना 50 खोके मिळाले. मी गेलो तर मला किती मिळतील. पण मला बाळासाहेबांचे नाव घेता येणार नाही. प्रबोधनकारांचा नातू मुंबईचे तुकडे करत असतील तर मी शेपूट घालून बसणार नाही. मुठभर असतील तरी त्यांना घेऊन मी त्यांना लाथ मारेन, असे यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले. 92-93 साली हिंदू कुठून आला? शिवसेनिकांवर केसेस झाल्या. गोळीला तुम्ही आणि पोळीला आम्ही अशी भाजप आहे. आपत्ती आली की शिवसैनिक आणि नंतर फोटो काढायला हे येतात, अशी टीका त्यांनी भाजपवर केली. 

जय महाराष्ट्र हे आजपासून जोरात बोला. आवाज त्यांच्या कानात घुमला पाहिजे. आम्हाला कोणी संस्कार शिकवण्याची गरज नाही. शिवसेनेचा जन्म मराठी माणसांच्या हक्कासाठी झाला. सत्ता येते आणि जाते. पण नाव जपणारी आहोत. शिवसैनिकांचा मुलगा म्हणून तुम्ही मला जपता. वादळात खेळत मी मोठा झालो पण तुम्हा सर्वा वादळाची जबाबदारी मी खांद्यावर घेऊन चाललोय. थोडक्यात पराभव झालाय पण महापालिकेत आपली ताकद गेलीय, असेही ठाकरे यावेळी म्हणाले. 

काहीजणांना सर्वकाही दिलं तरी नाराज. मला नाराज होण्याचा अधिकार नाही का? मला सर्व शिवसैनिक सारखे आहेत. मी तुमच्यावर नाराज कधी होणार नाही. जोपर्यंत तुम्ही शिवसैनिक आहात तोपर्यंत मी तुमचा पक्षप्रमुख आहे. जेव्हा माणसं विकली जातात तेव्हा वाईट वाटतं. ही लढाई लढताना माणसं विकली जातात तेव्हा वाईट वाटतं, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

About the Author

Pravin Dabholkar

"प्रवीण सुरेश दाभोळकर हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये चीफ सब एडीटर पदावर कार्यरत आहेत त्यांना मीडिया क्षेत्राचा 14 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल मीडियासह विविध माध्यमांमध्ये काम केले आहे. संशोधनात्मक अहवाल आणि फिचर रायटिंगकडे त्यांचा कल आहे. वाचकांना माहिती नसलेल्या कथा लोकांसमोर आणण्याची त्यांना आवड आहे. हे करीत असताना सविस्तर तपशील आणि अचूकतेकडे त्यांची कटाक्षाने नजर असते. फावल्या वेळात प्रविण आपल्या आनंदासाठी फिरणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि सामाजिक कार्यात गुंतलेले असतात. त्यांचे लेखन अनेकदा सामाजिक न्यायाच्या समस्यांबद्दलची त्यांची उत्कटता दर्शवते. तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात."

...Read More