Uddhav Thackeray: महाराष्ट्रात हिंदी सक्तीची होऊ देणार नाही. देवेंद्र हिंमत असेल तर करुन दाखवा, असे आव्हान उद्धव ठाकरेंनी केले. मुंबईत आपण मराठी-अमराठी एकत्र राहतोय. त्यात भांडण लावून हे भ्रष्टाचार करायला मोकळे. मुंबईत हिंदू-हिंदूमध्ये मारामाऱ्या लावल्या जात असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. हिंदी सक्तीच्या मुद्दावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी नाराजी व्यक्त केली होती. यानंतर आता उद्धव ठाकरेंनीदेखील यावरुन जाहीर भूमिका मांडली आहे. यावेळी उद्धव ठाकरेंनी नितेश राणेंवरदेखील निशाणा साधला.
हिंदु मुस्लिमवर एक बेडूक ओरडतो आणि आवाज कसा? उंची पेंग्विनची, चाल बदकाची आणि आवाज कोंबडीचा. तुझी पार्श्वभूमी काय. आणि कोणावर बोलतोय. एक कोणतरी बाप ठरवा. 59 वर्षाची शिवसेना झाली तरी भगवा एकच आहे. शिवसेना प्रमुखांनी महाराष्ट्रातील मराठी माणसांच्या रक्षणासाठी पक्षाची स्थापना केली. शेटजींचे बुट चाटण्यासाठी नाही केली.
लाडकी बहीणला देण्यासाठी पैसै नाहीत. इतरांचे पैसे वळवतात. अदानीला सगळकाही माफ. जागा, स्टॅम्प ड्यूटी माफ केला. देवनारचं डम्पिंग ग्राऊंड अदानीला देतायत. सामान्य माणसाला लढवताय. ही लढाई केवळ उद्धव ठाकरेची नाही. 1960 साली मराठी माणसाने रक्त सांडवून मुंबई महाराष्ट्राला मिळवून दिली. ही मुंबई आपल्याला वाचवायला हवी.
होणार की नाही होणार हे कळेल. यांच्या मनात आहे ते तुमच्या मनात आहे ते करेन. पण ते होऊ नये म्हणून मालकांचे नोकर भेटीगाठी घेतायत. मुंबई मराठी माणसाच्या हातात जाऊ नये म्हणून शेटजींचे नोकर प्रयत्न करतायत. होणारच नाही म्हणतायत. आमचं आम्ही बघू काय ते., असे उद्भव ठाकरे म्हणाले. भाजपचं नामोनिशाण आम्ही महाराष्ट्रातून मिटवून टाकू. 92-93 साली दंगल झाली होती तेव्हा तुम्ही मुंबई वाचवली होती.
आम्ही हिंदुत्व सोडले म्हणता व तुम्ही सौगात वाटता. सोफिया कुरेशीला दहशतवाद्यांची बहिण म्हणतात हे भाजपवाले आहेत. वॉर रूकवा दी पप्पा म्हणणारे ट्रम्पचा कॉल आल्यावर कुठं गेला आवाज?दहशतवादी गेले कुठं...पाताळात गेले की भाजपात..फक्त दाऊदला घ्यायचे तेवढे बाकी असल्याचा टोला ठाकरेंनी लगावला.
भाजपनं जेलच्या बाहेर स्टॉल टाकलेत...इथं येतो की तिकडे जातो. एसआयटीची एसटी झाली का...शिवसेना तुम्हाला संपवल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला आता भांडून चालणार नाही.हिंदू हिंदूमध्ये भांडणं लावायला सुरू केलीयत.हिंदी सक्तीची करू देणार नाही. गुजरातेत हिंदी करा सक्तीची..सू करा छे. ३ हजार कोटींचे जादा टेंडर रद्द केले...पैसे गेले कुठं? एक मंत्री स्वत:च्या अवलादीसाठी हॉटेल घेतोय. आता सतरंजीच्या खाली गेलात,तुमच्यावर उपरे नाचतायत, असे ठाकरे म्हणाले.
BRN
(19 ov) 89
|
VS |
TAN
90/0(10.1 ov)
|
Tanzania beat Bahrain by 10 wickets | ||
Full Scorecard → |
GER
(20 ov) 219/7
|
VS |
MAW
182/7(20 ov)
|
Germany beat Malawi by 37 runs | ||
Full Scorecard → |
AUS
(70.3 ov) 225 (37 ov) 121
|
VS |
WI
143(52.1 ov) 27(14.3 ov)
|
Australia beat West Indies by 176 runs | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.