'त्यांचा पक्ष..'मुंबई पालिकेत कॉंग्रेसने स्वबळाचा नारा दिल्यानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया!

Uddhav Thackeray on Congress:  काँग्रेसने सर्व 227 जागांवर स्वबळाचा नारा दिल्याने ठाकरे गटाची मतं विभागली जाण्याची भीती आहे.

प्रविण दाभोळकर | Updated: Nov 16, 2025, 05:05 PM IST
'त्यांचा पक्ष..'मुंबई पालिकेत कॉंग्रेसने स्वबळाचा नारा दिल्यानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया!
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray on Congress: लोकसभा निवडणुकीच्याआधी शिवसेनेच फूट पडली. यानंतर आलेल्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसल होता. या पार्श्वभूमीवर आता मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीकडे ठाकरेंचे लक्ष लागले आहे. सुरुवातीच्या टप्प्यात महाविकास आघाडी एकत्र लढणार असे वाटत होते, पण जसजसे दिवस लोटतायत तसे राजकारण वळण घेतंय. नुकतीच काँग्रेसने पालिका निवडणूक स्वतंत्र लढण्याची घोषणा करून आघाडीला धक्का दिला. यामुळे मुंबईत विरोधकांची एकजूट धोक्यात आली असून, भाजपला याचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. काँग्रेसने सर्व 227 जागांवर स्वबळाचा नारा दिल्याने ठाकरे गटाची मतं विभागली जाण्याची भीती आहे. यावर ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 

Add Zee News as a Preferred Source

बिहार निवडणुकीवर काय म्हणाले ठाकरे? 

उद्धव ठाकरेंनी बिहारच्या निकालावरून केंद्र सरकारवर टीका केली. तेजस्वी यादव यांच्या सभेला प्रचंड गर्दी झाली असताना, विजय कसा मिळाला, असा प्रश्न उपस्थित करत ते म्हणाले, "मुख्यमंत्री म्हणतात जो जिंकतो तोच शहाणा, पण त्यामागचे रहस्य काय? तेजस्वींच्या सभेला एआयची गर्दी होती का?" ज्या उमेदवारांच्या सभांना गर्दी नव्हती ते जिंकले, असे सांगत निवडणूक आयोगाच्या 65 लाख मतदार काढण्याच्या प्रक्रियेवर शंका घेतली. वाढणारे मतदार कुठून येतात, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेत प्रादेशिक पक्ष नष्ट करण्याचा कट रचला जातोय, असेही ते म्हणाले. 

ठाकरेंची मोदींवर टीका

मुंबईत मतदार याद्यांमध्ये गोंधळ असल्याबाबत उद्धव यांनी सांगितले की, त्यांनी आक्षेप नोंदवले पण कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. पंतप्रधान मोदींनी प्रादेशिक पक्ष संपवायचे असल्याचे म्हटले होते, त्याचाच भाग हे असल्याचे त्यांनी सूचित केले. ही टीका निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर केंद्रित आहे आणि बीएमसी निवडणुकीतही असेच घोटाळे होऊ शकतात, अशी भीती ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली.

उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

आमदार हारुन खान यांच्या क्रिकेट स्पर्धेच्या लोगोचे अनावरण मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांनी केले. तेव्हा माध्यमांशी बोलताना त्यांनी काँग्रेसच्या निर्णयावर पहिल्यांदा भाष्य केले. काँग्रेसने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला असल्याबाबत विचारले तेव्हा उद्धव म्हणाले, "त्यांच्या पक्षाने हा निर्णय घेतला आहे, ते त्यांच्या पक्षाचे नेते आहेत आणि निर्णय घेण्याचे त्यांचे अधिकार आहेत. मी माझ्या पक्षाचा निर्णय घेण्यास सक्षम आहे." 

ठाकरे गटावर काय परिणाम? 

काँग्रेसच्या स्वतंत्र लढण्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये ठाकरे गटाला मिळवलेले मुस्लिम आणि अनुसूचित जाती मतदार पुन्हा काँग्रेसकडे वळण्याची शक्यता आहे. यामुळे शिवसेना (ठाकरे) गटाची ताकद कमी होईल आणि भाजपला सोयीचा वातावरण मिळेल. उद्धव यांच्या या प्रतिक्रियेमुळे आघाडीतील फूट स्पष्ट झाली असून, बीएमसी निवडणूक ही ठाकरे गटासाठी टर्निंग पॉइंट ठरेल. पक्षाने आता स्वतंत्र रणनीती आखण्याची वेळ आली आहे. 

FAQ

१. प्रश्न: काँग्रेसने मुंबई महापालिका निवडणुकीत स्वबळाचा नारा का दिला?

उत्तर: काँग्रेसने बीएमसीच्या सर्व २२७ जागांवर स्वतंत्र लढण्याची घोषणा केली आहे. यामुळे महाविकास आघाडीमध्ये फूट पडली असून, ठाकरे गट आणि भाजप यांच्यातील स्पर्धेत बदल होऊ शकतो. काँग्रेसला स्वतःची ताकद दाखवायची आहे.

२. प्रश्न: उद्धव ठाकरेंनी काँग्रेसच्या निर्णयावर काय प्रतिक्रिया दिली?

उत्तर: उद्धव ठाकरे म्हणाले, "त्यांच्या पक्षाने हा निर्णय घेतला आहे, ते त्यांच्या पक्षाचे नेते आहेत आणि निर्णय घेण्याचे अधिकार त्यांचे आहेत. मी माझ्या पक्षाचा निर्णय घेण्यास सक्षम आहे." ही प्रतिक्रिया मातोश्रीवर क्रिकेट स्पर्धेच्या लोगो अनावरणानंतर माध्यमांशी बोलताना दिली.

३. प्रश्न: बिहार निवडणुकीबाबत उद्धव ठाकरेंनी काय टीका केली?

उत्तर: उद्धव यांनी तेजस्वी यादवांच्या सभेला गर्दी असूनही पराभव झाल्यावरून शंका घेतली. ते म्हणाले, "ज्यांच्या सभांना गर्दी नव्हती ते जिंकले. निवडणूक आयोगाने ६५ लाख मतदार काढले, पण वाढणारे मतदार कुठून येतात? प्रादेशिक पक्ष संपवायचे आहे." मुंबईत मतदार याद्यांवर आक्षेप घेतल्यानंतरही प्रतिसाद मिळाला नाही, असेही सांगितले.

About the Author

Pravin Dabholkar

"प्रवीण सुरेश दाभोळकर हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये चीफ सब एडीटर पदावर कार्यरत आहेत त्यांना मीडिया क्षेत्राचा 14 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल मीडियासह विविध माध्यमांमध्ये काम केले आहे. संशोधनात्मक अहवाल आणि फिचर रायटिंगकडे त्यांचा कल आहे. वाचकांना माहिती नसलेल्या कथा लोकांसमोर आणण्याची त्यांना आवड आहे. हे करीत असताना सविस्तर तपशील आणि अचूकतेकडे त्यांची कटाक्षाने नजर असते. फावल्या वेळात प्रविण आपल्या आनंदासाठी फिरणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि सामाजिक कार्यात गुंतलेले असतात. त्यांचे लेखन अनेकदा सामाजिक न्यायाच्या समस्यांबद्दलची त्यांची उत्कटता दर्शवते. तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात."

...Read More