Versova Dahisar Coastal Road: मुंबईकरांसाठी आणखी एका प्रकल्पाचे काम हाती घेण्यात येत आहे. वर्सोवा ते दहिसरपर्यंत आता थेट कोस्टल रोड बांधण्यात येत आहे. तसंच, या प्रकल्पाची जोडणी अन्य रस्त्यांनादेखील करण्यात येणार आहे. मुंबई महापालिका या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात भूसंपादन करणार आहे. तसंच, या प्रकल्पासाठी एका सल्लागाराचीही नियुक्ती करण्यात येणार असून त्यानुसार एक टेंडर जारी करण्यात येईल. तर, या प्रकल्पासाठी 350 हेक्टर जमिनीचे अधिग्रहण करण्यात येईल.
मिळालेल्या माहितीनुसार, मरीन ड्राइव्ह ते वरळीदरम्यान कोस्टल रोडचे काम पूर्ण झाल्यानंतर आता मुंबई महानगरपालिका वर्सोवा ते दहिसरपर्यंत कोस्टल रोड प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. हा प्रकल्प काही भागात दुहेरी उन्नत मार्ग आणि काही ठिकाणी खाडीतून बोगदा तयार करण्यात येणार आहे. गोरेगाव-मुलुंड लिंक रोडला जोडून पश्चिम व पूर्व उपनगरातील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. हा प्रकल्प सहा टप्प्यात बनणार असून यासाठी 16,621 कोटी रुपये इतकी आहे.
वर्सोवा- दहिसर कोस्टल रोड 22 किमी लांबीची आहे. या प्रकल्पामुळं प्रवासाचा वेळ वाचणार आहे. महापालिकेच्या जमिनीवर कोस्टल रोडचे कामकाज काही अंशी सुरू झाले आहे. या प्रकल्पासाठी सरकारी जमीनीबरोबरच काही खासगी जमिनीचीदेखील आवश्यकता आहे. यासाठी महापालिकेला भूसंपादनासह अनेक परवानग्या घेणे गरजेचे असणार आहे.
या प्रकल्पाशी संबंधित परिसरात मढ ते वर्सोवापर्यंत एक पूल बांधण्यात येणार आहे. तर, मालाड पश्चिम क्षेत्र आणि कांदिवली येथे वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी मलाड-मार्वे-मनोरी रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सर्व्हिस रोड आणि विकास योजनेंतर्गंत येणाऱ्या वेगवेगळ्या प्रकल्पांवरही काम करण्यात येणार आहे.
कोस्टल रोडसंबंधित कामांसाठी एकूण 350 हेक्टर जमीनीचे भूसंपादन करण्यात येणार आहे. यातील जवळपास 200 हेक्टर जमीन किनारी मार्गासाठी अधिग्रहित करण्यात आली आहे. यासाठी पालिकेने वेगवेगळ्या परवानगी मिळवली आहे. तसंच, लवकरच निवीदादेखील काढण्यात येणार आहेत.
वर्सोवा ते दहिसर कोस्टल रोडचे काम सहा टप्प्यात पूर्ण होणार आहे. पहिला टप्पा वर्सोवा ते बांगुर नगर, दुसरा टप्पा बांगुर नगर ते माइंड स्पेस मालाड आणि गोरेगाव-मुलुंड लिंक रोडला जोडणी. तिसरा टप्पा माइंड स्पेस-मालाड ते चारकोप उत्तरेकडे बोगदा, चौथा टप्पा चारकोप ते माइंड स्पेस मालाड दक्षिण बोगदा, टप्पा पाचव्यात: चारकोप ते गोराई, टप्पा सहावा: गोराई ते दहिसर. या प्रकल्पात रस्ता, उड्डाणपूल आणि केबल पूल यांचा समावेश आहे.
हा प्रकल्प वर्सोवा ते दहिसर या दरम्यान बांधण्यात येणारा एक थेट कोस्टल रोड (किनारी रस्ता) आहे, जो मुंबईकरांसाठी प्रवासाचा वेळ कमी करेल.
वर्सोवा-दहिसर कोस्टल रोडची एकूण लांबी २२ किलोमीटर आहे.
या प्रकल्पासाठी 16,621 कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे.
मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्रा टाइम डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि अर्थ (infrastructure) या विषयात विशेष रुची आहे. त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड. इन्फ्रास्ट्रक्चर आणि गुन्हे या बातम्यांमध्ये हातखंडा.
...Read More|
SIN
(19.3 ov) 110
|
VS |
MAS
111/4(11.4 ov)
|
| Malaysia beat Singapore by 6 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
THA
(20 ov) 153/7
|
VS |
PHI
156/9(19.4 ov)
|
| Philippines beat Thailand by 1 wicket | ||
| Full Scorecard → | ||
|
THA
(13.3 ov) 62
|
VS |
MAS
67/2(5.4 ov)
|
| Malaysia beat Thailand by 8 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.