)
Mahesh Manjrekar On Uddhav Thackeray : प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर यांनी 24 तासच्या टू द पॉईंट या कार्यक्रमात अनेक गौप्यस्फोट केलेत. राजकारणापासून निवडणुकीबद्दल त्यांनी अनेक विषयावर झी 24 तासचे संपादक कमलेश सुतार यांच्याशी दिलखुलास गप्पा मारल्यात. महेश मांजरेकर यांनी या मुलाखतीत सांगितलं की, राजकारण आवडतं पण निवडणूक नकोशी वाटते. त्याच वेळी उद्धव ठाकरे यांना वर्षा बंगल्यावर भेटायला गेलो असता, त्यावेळी नेमकं काय घडलं याबद्दलही त्यांनी या मुलाखतीत सांगितलं.
या मुलाखतीदरम्यान संपादक कमलेश सुतार यांनी महेश मांजरेकर यांना विचारलं की, तुमचा आवडता राजकीय नेता कोण. त्यावर उत्तर देताना त्यांनी उद्धव ठाकरेचं नाव घेतलं. त्यानंतर पुढे ते म्हणाले की, कोणताच व्यक्ती हा वाईट नसतो. कुणाचं राजकीय मत वेगळे असेल तर ठिक आहे, पण मी त्यात विषय लक्ष देत नाही.
पुढे ते म्हणाले की, एकदा असं झालं की माझी मुलीने मेजर नावाच्या चित्रपटात काम केलं. तो चित्रपट संदीप उन्नीकृष्णन यांच्या जीवनावर आधारित होता. तिच्यासोबत या चित्रपटात तेलुगू नायक होता. त्या अभिनेत्याने माझ्या मुलीला एक इच्छा बोलून दाखवली. तो म्हणाला की, तुझ्या बाबांना सांग मला उद्धव ठाकरेंना भेटायचं आहे. त्याची ही इच्छा तिने मला सांगितली.
त्यानंतर मी माझ्या एका मित्राला सांगितलं, मग त्याने उद्धव ठाकरेंच्या सेक्रेटरींना फोन करुन भेटीसाठी वेळ मागितली. सेक्रेटरीने भेटीसाठी किती वेळ लागेल तर मी त्यावेळी 10-15 मिनिटाच काम आहे, असं सांगितलं. त्यांनी आम्हाला दुपारी 12.30 वाजताची भेटची वेळ दिली. तेव्हा त्यांना सांगितलं दिलेल्या वेळेत येईल तो अभिनेता. त्यावेळी सेक्रेटरीने सांगितलं, त्यांना तुम्ही पण हवे आहात त्या अभिनेत्यासोबत. मग दिलेल्या वेळेत मी आणि माझ्यासोबत अजून दोन जण वर्षा बंगल्यावर पोहोचलो.
त्यांनी पुढे सांगितलं की, त्यावेळी उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते. वर्षा बंगल्यावर गेल्यावर मी आत गेलो आणि माझ्यासोबतचे दोघांना बाहेर वेटिंग रुममध्ये बसलाय सांगितलं. मग मी माझी मुलगी आणि तो अभिनेता आतल्या खोलीत गेलो. आत गेल्यावर तिथे उद्धव ठाकरे, वहिनी आणि आदित्य होता. आम्हाला 15 मिनिटं भेटीची वेळ देण्यात आली होती. पण आम्ही तिथे दोन तास होतो, नाश्ता दुपारचं जेवण करुनच तिथून निघालो. वहिनींही आमच्यासोबत बाहेर बसलेल्या त्या दोन जणांचंही आदरातिथ्य केलं.
प्रश्न १: महेश मांजरेकरांनी कोणत्या कार्यक्रमात राजकारण आणि निवडणुकीबद्दल बोलले?
उत्तर: महेश मांजरेकरांनी झी २४ तासच्या '२४ तास टू टू पॉईंट' या कार्यक्रमात संपादक कमलेश सुतार यांच्याशी बोलताना राजकारण आवडते पण निवडणूक नकोशी वाटते असे सांगितले. त्यांनी अनेक विषयांवर दिलखुलास गप्पा मारल्या.
प्रश्न २: महेश मांजरेकरांचा आवडता राजकीय नेता कोण आहे?
उत्तर: महेश मांजरेकरांनी उद्धव ठाकरे यांचे नाव घेतले. ते म्हणाले की, कोणताही व्यक्ती वाईट नसतो आणि राजकीय मत वेगळे असले तरी त्यात लक्ष देत नाहीत.
प्रश्न ३: उद्धव ठाकरेंना भेटण्याची घटना कशी घडली?
उत्तर: महेश मांजरेकरांच्या मुलीने 'मेजर' या चित्रपटात (संदीप उन्नीकृष्णन यांच्या जीवनावर आधारित) तेलुगू अभिनेत्यासोबत काम केले. त्या अभिनेत्याने उद्धव ठाकरेंना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. महेश यांनी मित्राला सांगितले, त्याने सेक्रेटरींना फोन करून भेटीसाठी वेळ मागितली.