)
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगरची चर्चा राहिली. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सहा खासदार फोडल्यानंतर विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनीही साथ सोडली. यानंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सचिन अहिर विधान परिषद उप-सभापती त्यांची निवड झाली. उद्धव ठाकरेंचे अतिशय जवळचे आणि विश्वासू सचिन अहिर यांनी हा निर्णय का घेतला असा प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेला पडले. याच प्रश्नांची उत्तर झी २४ तासाच्या 'टू द पॉईंट' या विशेष मुलाखतीतून दिले आहेत.
सचिन अहिरे म्हणाले की, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय अचानक झाला. मी आठ दिवसांपूर्वी आदित्य ठाकरेंसोबत पुण्याच्या दौऱ्या केला. तेव्हा माझं काही ठरलं नव्हतं. उद्धव ठाकरेंनी जी जबाबदारी दिली त्याचे झीज देण्याचे काम मी केलं. जर मी 2019 मध्ये ती भूमिका घेतली नसती. तर आदित्य ठाकरे वरळीतून उभे राहू शकले नसते. त्यांनी दुसऱ्या मतदारसंघातून निवडणूक लढवली असती. आदित्य ठाकरेंना आमदार बनवण्यात माझा वाटा होताना.