झी 24 तासचे संपादक कमलेश सुतार यांचा मुक्तपीठ पुरस्काराने गौरव

झी 24 तासचे संपादक कमलेश सुतार यांना मुक्तपीठ पुरस्काराने गौरविण्यात आलं आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Jun 13, 2025, 08:59 PM IST
झी 24 तासचे संपादक कमलेश सुतार यांचा मुक्तपीठ पुरस्काराने गौरव

झी 24 तासचे संपादक कमलेश सुतार यांना मुक्तपीठ सन्मान पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले आहे. हा सोहळा मुंबईत पार पडला. या सोहळ्याला महाराष्ट्रातील अनेक सामाजिक आणि कला क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. 

झी 24 तासचे संपादक कमलेश सुतार यांना मुक्तपीठ या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.  मुक्तपीठ आणि जिजाऊ सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेकडून या पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तिमत्वांचा मुक्तपीठ सन्मान पुरस्कारानं सत्कार करण्यात आला आहे. 

 पत्रकारितेत क्षेत्रातील योगदानाबद्दल कमलेश सुतार यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या उपस्थितीत कमलेश सुतार यांना गौरवण्यात आलं आहे. या सोहळ्याप्रसंगी महाराष्ट्रातील सामाजिक आणि कला क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.