Nagpur Murder: नागपुरात पती-पत्नीने दिवसाढवळ्या एका तरुणाची हत्या केली आहे. रस्त्याच्या शेजारी झालेल्या हत्येचा हा थरार व्हिडीओत कैद झाला आहे. खापरखेडा परिसरात ही हत्या झाली असून, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सागर वानखेडे असं मृतकाचं नाव असून आरोपी पत्नी सोनाली गजभिये आणि पती राजू गजभिये यांना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण करण्यासाठी जात असतानाच त्यांना अटक करण्यात आली. गंभीर जखमी झालेल्या सागरचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी कोराडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
पोलीस तपासात उघड झालं की, मृत तरुण आणि आरोपी महिलेमध्ये प्रेमसंबंध होते. शिकत असताना मृत तरुण आणि आरोपी महिलेमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते. मृत सागर पुण्यात नोकरी करत होता आणि होळी साजरी करण्यासाठी गावी नागपूरला आला होता. यावेळी त्याने केलेल्या एका मेसेजमुळे त्याची हत्या झाली.
सोनाली आणि सागरचे लग्नापूर्वी प्रेमसंबंध होते. मात्र सोनालीने राजू गजभिये यांच्याशी लग्न केलं होतं. त्यांना दोन मुले आहेत. परंतु सोनाली आणि सागर लग्नानंतरही संपर्कात होते. राजू गजभिये यांनी खापरखेडा पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. सागर होळीनिमित्त पुण्याहून गावी आला होता. या दरम्यान त्याने सोनालीला इंस्टाग्रामवर भेटायला येण्यासाठी मेसेज केला होता.
सागरने मेसेज पाठवल्यानंतर पती-पत्नीने त्याच्या हत्येचा कट रचला. त्यानुसार, सोनालीने त्याला भेटायला येण्याचं मान्य केलं. गुरुवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास सागर खापरखेडा येथे पोहोचला. त्यावेळी सोनाली तिथेच त्याची वाट पाहत थांबली होती. सोनाली श्याम मंगल कार्यालयाजवळ त्याच्या दुचाकीवर बसली आणि तिथून निघाले. सोनाली यावेळी तिच्यासोबत चाकू घेऊन आली होती. दरम्यान, राजू गजभिये मुलांना शाळेत सोडल्यानंतर, त्यांचा पाठलाग करू लागला.
खापरखेडा-कोराडी रस्त्यावरील कोलार नदीचा पूल ओलांडल्यानंतर, सोनालीने मुद्दामून तिची पर्स खाली पाडली. सागरने बाईक थांबवली आणि पर्स घेण्यासाठी खाली उतरला, तेव्हा सोनालीने चाकू काढला आणि त्याच्यावर दोन वार केले. त्याच वेळी घटनास्थळी पोहोचलेल्या राजू गजभियेनेही सागरवर अनेक वार केले. गंभीर जखमी झालेल्या सागरचा जागीच मृत्यू झाला आरोपी पती-पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे.
घटनेनंतर आरोपी जोडपे घरी परतले होते. पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण कऱण्यासाठी जात डीबी पथकाने त्यांना ताब्यात घेतलं. चौकशीदरम्यान दोघांनीही हत्येची कबुली दिली आहे.
सागरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नागपूरच्या सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. कोराडी पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे खापरखेडा आणि परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे.
...Read More|
RCB
(20 ov) 240/4
|
VS |
MI
222/5(20 ov)
|
| Royal Challengers Bengaluru beat Mumbai Indians by 18 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
LSG
(20 ov) 164/8
|
VS |
GT
165/3(18.4 ov)
|
| Gujarat Titans beat Lucknow Super Giants by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NAM
(49 ov) 198
|
VS |
SCO
199/3(38 ov)
|
| Scotland beat Namibia by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.