'काहीजण म्हणतात अजितदादा अजूनही जिवंत आहेत, कोणी म्हणतात पायलट वेळेवर...'; बड्या नेत्याचं विधान

Ajit Pawar Death In Plane Crash: अजित पवारांच्या विमानाचा अपघात 28 जानेवारी रोजी बारामती विमानतळाजवळ झाला. या अपघातामध्ये अजित पवारांसहीत सहा जणांचा मृत्यू झाला असून अपघातासंदर्भात अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत.

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 3, 2026, 02:39 PM IST
'काहीजण म्हणतात अजितदादा अजूनही जिवंत आहेत, कोणी म्हणतात पायलट वेळेवर...'; बड्या नेत्याचं विधान
अजित पवारांच्या मृत्यूबद्दल अनेकांना शंका (प्रातिनिधिक फोटो)

Ajit Pawar Death In Plane Crash: उपमुख्यमंत्री अजित पवारांचं 28 जानेवारी रोजी विमान अपघातामध्ये निधन झाल्यानंतर या अपघातासंदर्भात राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. संजय राऊतांच्या आधीच अजित पवारांच्या पक्षाचे विधानपरिषद आमदार अमोल मिटकरींनीही या अपघातासंदर्भात शंका उपस्थित करताना हा घातपात तर नाही ना अशी शंका घेतली आहे. मिटकरींनी विचारलेल्या प्रश्नांची री ओढत राऊतांनी मिटकरींनी उपस्थित केलेल्या शंका गंभीर स्वरुपाच्या असल्याचं म्हटलं आहे. राऊतांनी हा मुद्दा राज्यसभेतील चर्चेदरम्यानही पटलावर आणल्याचं समर्थन केलं. आता याच विषयावर राज्यातील एका मोठ्या नेत्याने भाष्य केलं आहे. 

Add Zee News as a Preferred Source

एक उद्योगपती येऊन दोन पक्षात समेट करतोय

अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात उपस्थित केल्या जाणाऱ्या शंका, दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण यासारख्या प्रश्नांवर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपुरमध्ये पत्रकाराशीं चर्चा केली. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भात बोलताना, "त्यांच्या अंतर्गत बाबीत बोलण्याची गरज नाही. मात्र आता एक उद्योगपती येऊन दोन पक्षात समेट करत आहेत. मात्र हे विलीनीकरण होत असताना एनडीएला पाठिंबा द्यावा यावर एकमत होणे बाकी आहे.  मध्यस्थी गुजरातचे आणि देशातील एक मोठे उद्योगपती प्रयत्न सुरू केल्याची माहिती माझ्याकडे आहे आणि त्यातून हे विलीनीकरण झाल्यानंतर पुढे एनडीए बरोबरच या मंडळींनी राहावे अशा अटी आणि शर्ती घातल्या आहेत," असा दावा केला आहे.  

नक्की वाचा >> अजित पवारांचा विमान अपघात 'ऑपरेशन लोटस'चा भाग? खासदाराचा सवाल; 'भाजपला विरोध करणारा जीव गमावतो किंवा..'

अनेक गोष्टी शंका घेण्यासारख्या

संजय राऊतांनी अजित पवारांच्या निधनासंदर्भात केलेल्या विधानांसंदर्भात वडेट्टीवारांना विचारण्यात आलं. यावर बोलताना त्यांनी, "या संदर्भात फार मोठा असंतोष जनतेमध्ये सुद्धा आहे. लोकांना अजित दादांचा मृत्यू आणि जो अपघात झाला तो पटत नाही. त्यामुळे हे अनेक तर्कवितर्क सगळीकडे लावले जात आहेत. काहीजण म्हणतात अजितदादा अजूनही जिवंत आहेत. कोणी म्हणतात पायलट वेळेवर का बदलला? अशा अनेक गोष्टी शंका घेण्यासारख्या आहेत. त्यामुळे एवढ्या मोठ्या नेत्याचा, लोकप्रिय नेत्याचा मृत्यू होतो त्यावेळी संपूर्ण चौकशी होणे आणि यातून दूध का दूढ आणि पाणी का पाणी होणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने चौकशी झाली पाहिजे," असं मत व्यक्त केलं आहे.

नक्की वाचा >> अजित पवारांचा अपघाताचं गूढ वाढलं! मृतदेहाची ओळख ज्याने पटली 'ती' गोष्टच आता सापडेना?

...म्हणून सीआयडी नको सीबीआय चौकशी करा!

अजित पवारांच्या विमान अपघाताची सीआयडी चौकशी करण्याच्या मागणीसंदर्भात वडेट्टीवार यांनी खोचक उत्तर दिलंय. "राज्यात दीडशे सीआयडी चौकशी सुरू आहे. आयडी चौकशी म्हणजे वेळ काढूपणा आहे. त्यात पाच टक्के पण देखील काही निष्पन्न झालं नाही. त्यामुळे ही चौकशी सीबीआयकडून व्हावी अशी सगळ्यांची मागणी आहे," असंही वडेट्टीवार म्हणालेत. 

About the Author

Swapnil Ghangale

स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.

...Read More