Nagpur Bench on Use of Nylone Thread: मकरसंक्रात जवळ येत असल्याने यानिमित्ताने पुन्हा एकदा आकाशात पतंगी भरारी घेताना दिसतील. मात्र पतंग उडवताना नायलॉन मांजाचा वापर केल्याने अनेकदा दुर्घटना होतात. तसंच काही पक्ष्यांनाही आपला जीव गमवावा लागतो. नायलॉन मांजामुळे होणाऱ्या अपघातांमध्ये काहींना जीवही गमवावा लागला आहे. याची दखल घेत मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने महत्त्वाचा आदेश दिला आहे.
नायलॉन मांजामुळे होणाऱ्या अपघातांची उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्वतःहून दखल घेत जनहित याचिका दाखल केली. यावेळी पतंगीला नायलॉन मांजा आढळल्यास 50 हजारांचा दंड आकारावा असा आदेश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. नायलॉन मांजा विक्री आणि निर्यातीसाठी 2.5 लाखांचा दंड का लावू नये, अशी विचारणाही उच्च न्यायालयाने केली आहे.
हायकोर्टाने यावेळी पोलीस प्रशासन कारवाई करण्यात अपयशी ठरल्याने तीव्र नाराजी जाहीर केली. तसंच 27 डिसेंबरपर्यंत सार्वजनिक नोटीस प्रसिद्ध करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
महत्त्वाचं म्हणजे, अल्पवयीन तरुण किंवा तरुणींकडे नायलॉन मांजा आढळल्यास पालकांवरही 50 हजार दंड प्रस्तावित आहे. नायलॉन मांजामुळे घटना घडल्यास पोलीस उपायुक्त आणि अधीक्षक जबाबदार धरले जाणार आहेत. याप्रकरणी पुढील सुनावणी 5 जानेवारीला होणार आहे. आक्षेप नसल्यास दंडात्मक नियम लागू होणार असल्याच्या नागपूर खंडपीठाच्या स्पष्ट सूचना आहेत.
इंदूरहून छत्रपती संभाजीनगर शहरात छुप्या पद्धतीने नायलॉन मांजाचा साठा आणला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. इंदूरमधून आलेल्या नायलॉन मांजाच्या 288 रिळांचे सहा बॉक्सचे पार्सल येताच गुन्हे शाखेच्या पथकाने धडक कारवाई केली. या कारवाईत दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे ऋतिक दिलीप लोधे आणि गणेश रामकिसन औताडे अशी आहेत. ही कारवाई शहरातील बन्सीलालनगर परिसरात करण्यात आली.
नाशिकच्या मनमाडमध्ये नायलॉन मांजामुळे महिला डॉक्टर गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आल्याने नायलॉन मांजाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. स्त्री रोग तज्ञ असलेल्या डॉक्टर विद्या योगेश मगर नेहमी प्रमाणे दुचाकीवरून क्लिनिकमध्ये जात असताना ईदगाह भागातील पुलावर अचानक नायलॉन मांजा चेहऱ्यावर आला. त्यामुळे त्यांचा डावा डोळा थोडक्यात बचावला तर चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्याने त्यांच्यावर कॉस्मेटिक सर्जरी करून 25 टाके टाकण्यात आले.
शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे.
...Read More|
ENG
(97.3 ov) 384 (88.2 ov) 342
|
VS |
AUS
567(133.5 ov) 161/5(31.2 ov)
|
| Australia beat England by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
AUS
(45.2 ov) 152 (34.3 ov) 132
|
VS |
ENG
110(29.5 ov) 178/6(32.2 ov)
|
| England beat Australia by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
IND
(20 ov) 231/5
|
VS |
SA
201/8(20 ov)
|
| India beat South Africa by 30 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.