Maharashtra HSC Paper Leak : बारावीचे 2 पेपर फुटले, व्हॉट्सअ‍ॅपवर उत्तर व्हायरल; कोणाचा प्रताप?

Maharashtra 12th HSC Exam Paper Leak News: अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागपुरात चक्क बारावीच्या दोन विषयांचे पेपर फुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा पेपर नेमका कसा फुटला? या सगळ्याला जबाबदार कोण? यावर काय कारवाई होणार? 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Feb 23, 2026, 11:08 AM IST
Maharashtra HSC Paper Leak : बारावीचे 2 पेपर फुटले, व्हॉट्सअ‍ॅपवर उत्तर व्हायरल; कोणाचा प्रताप?

Maharashtra 12th HSC Exam Paper Leak News: नागपूरमध्ये फेब्रुवारी 2026 मध्ये बारावीच्या बोर्ड परीक्षेदरम्यान फिजिक्स (Physics) आणि केमिस्ट्री (Chemistry) या दोन विषयांचे पेपर फुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 18 फेब्रुवारी 2026 रोजी केमिस्ट्रीच्या पेपर दरम्यान, सेंट उर्सुला गर्ल्स हायस्कूल या परीक्षा केंद्रावर एका विद्यार्थिनीच्या संशयास्पद हालचालींमुळे हा प्रकार उघडकीस आला. ती विद्यार्थिनी वारंवार वॉशरूमला जात असल्यामुळे पर्यवेक्षकांना संशय आला. तिची तपासणी केली असता तिच्याकडे स्मार्ट फोन आढळला. या फोनमधील व्हॉट्सॲप ग्रुपवर परीक्षेपूर्वीच प्रश्नपत्रिका आणि त्यांची उत्तरे आलेली होती. तपासात असे समोर आले की, केवळ 18 फेब्रुवारीचा केमिस्ट्रीचाच नाही, तर 16 फेब्रुवारी रोजी झालेला फिजिक्सचा पेपरही अशाच प्रकारे व्हॉट्सॲपवर प्रसारित झाला होता. 

Add Zee News as a Preferred Source

प्राथमिक तपासात नागपूरच्या माणकापूर भागातील एका खाजगी शिकवणीच्या (Tuition Class) शिक्षकाने हे पेपर फोडल्याचा संशय आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन व्यक्तींना अटक केली आहे. निशिकांत मून आणि फरहान  अशी अटकेतील आरोपींची नावे  आहे. आरोपी निशिकांत मून हा एका ट्युशन क्लासेसचा संचालक असून त्याच्याकडे फरहान हा शिक्षक म्हणून काम करतो. नागपुरातील सेंट उर्सुला परीक्षा केंद्रावर गुरुवारी बारावीचा केमिस्ट्री पेपर होता. या पेपर दरम्यान एक विद्यार्थिनी वारंवार प्रसाधन गृहात जात असल्यामुळे पर्यवेक्षकांना संशय आला. महिला शिक्षिकेने तिची झेडपी घेतली असता तिच्याकडे स्मार्टफोन आढळून आला. या स्मार्टफोन मधील एका व्हाट्सअप ग्रुप मध्ये पेपर सुरू होण्यापूर्वीच पेपर आणि त्याची उत्तरे आढळून आली होती. त्यावरून पेपर तासभरा पूर्वीच फुटल्याचा संशय पर्यवेक्षकांना आला. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणा  सदर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला. दरम्यानच्या व्हाट्सअप ग्रुप वरून हा पेपर लीक झाला होता त्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये निशिकांत एडमिन तर फरhaन प्रश्नांची उत्तरे सोडून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली होती. या पेपर फुटी प्रकरणी पोलीसांना अजून काही धागेदोरे मिळाले आहे.

बोर्डाची भूमिका काय आहे?

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) स्पष्ट केले आहे की, हा प्रसार एका मर्यादित व्हॉट्सॲप ग्रुपपुरता होता, त्यामुळे या विषयांची फेरपरीक्षा घेतली जाणार नाही. याप्रकरणी नागपूरच्या सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेनंतर बोर्डाने परीक्षा केंद्रांवर अधिक दक्षता घेण्याचे आदेश दिले आहेत. आता प्रश्नपत्रिका थेट परीक्षेच्या वेळेतच वितरित केल्या जात आहेत आणि विद्यार्थ्यांना शेवटची १० मिनिटे वाढवून दिली जात आहेत. विद्यार्थी आणि पालकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीसाठी महाराष्ट्र राज्य मंडळाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.               
बारावी दोन पेपर फूटल्याप्रकरणी शिकवणी वर्गाच्या संचालकासह दोघांना अटक करण्यात आली आहे . निशिकांत मून आणि फरहान  अशी अटकेतील आरोपींची नावे  आहे. आरोपी निशिकांत मून हा एका ट्युशन क्लासेसचा संचालक असून त्याच्याकडे फरहान हा शिक्षक म्हणून काम करतो.

कसा उघडकीस आला हा प्रकार?

 नागपुरातील सेंट उर्सुला परीक्षा केंद्रावर गुरुवारी बारावीचा केमिस्ट्री पेपर होता. या पेपर दरम्यान एक विद्यार्थिनी वारंवार प्रसाधनगृहात जात असल्यामुळे पर्यवेक्षकांना संशय आला. महिला शिक्षिकेने तिची झेडपी घेतली असता तिच्याकडे स्मार्टफोन आढळून आला. या स्मार्टफोन मधील एका व्हाट्सअप ग्रुप मध्ये पेपर सुरू होण्यापूर्वीच पेपर आणि त्याची उत्तरे आढळून आली होती. त्यावरून पेपर तासभरा पूर्वीच फुटल्याचा संशय पर्यवेक्षकांना आला. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणा  सदर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला. दरम्यानच्या व्हाट्सअप ग्रुप वरून हा पेपर लीक झाला होता त्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये निशिकांत एडमिन तर फरहान प्रश्नांची उत्तरे सोडून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली होती. या पेपर फुटी प्रकरणी पोलीसांना अजून काही धागेदोरे मिळाले आहे.

About the Author

Dakshata Thasale

दक्षता ठसाळे-घोसाळकर या 'झी 24 तास डिजिटल'मध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत आहे. यांना पत्रकारिता या क्षेत्रातील 14 वर्षांचा अनुभव आहे. 'प्रहार' आणि 'लोकमत' या आघाडीच्या वृत्तसंस्था आणि 'टीव्ही 9' आणि 'न्यूज एक्सप्रेस मराठी' या आघाडीच्या वृत्तवाहिनीचा अनुभव घेतल्यानंतर डिजीटल क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. 'India.com मराठी' या डिजीटल वेबसाईटमध्ये काम केल्यानंतर 'महाराष्ट्र टाईम्स' च्या ऑनलाईन वेबसाईटसाठी काम केलं. यानंतर 'झी 24 तास डिजीटल'मध्ये विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं आहे. यामध्ये Lifestyle, आरोग्य, मनोरंजन यामधील बातम्यांमध्ये हातखंडा असून राज्यस्तरीय घडामोडी, गुन्हे आणि राजकीय घडामोडींमध्ये सर्वात मोठं योगदान आहे. पालकत्व, गर्भधारणा आणि पाककृती यासंदर्भात लेख लिहण्यास विशेष रुची आहे. 

...Read More