Ladki Bahin Yojana Increment In Monthly Payment: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना तुफान शाब्दिक फटकेबाजी केली. अनेक चित्रपटांमधील डायलॉग वापरत शिंदेंनी सरकारने एका वर्षात केलेल्या कामांचा पाढा वाचतानाच सध्या सुरु असलेल्या योजना सुरुच राहणार असल्याचं अधोरेखित केलं. इतकेच नाही तर त्यांनी लाडक्या बहिणींना दर महिना दिल्या जाणाऱ्या निधीमध्ये वाढ करणार असल्याचंही सांगितलं आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना आता 1500 रुपयांच्या हफ्त्याऐवजी लवकरच अधिक मोठा हफ्ता मिळणार आहे. हा हफ्ता किती असणार हे ही शिंदेंनी सांगितलं आहे. विरोधी पक्षनेतेपदापासून ते अधिवेशनाच्या कालावधीपर्यंत आणि शेतकरी कर्जमाफीपासून लाडक्या बहिणींना पैसे वाढवून देण्याबद्दल शिंदे काय म्हणाले ते पाहूयात...
"राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्याच्या इतिहास अभ्यासक्रमात समाविष्ट करून घेत आहोत. महाराजांचा संपूर्ण जीवनपट यात दिसेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान, दादा भुसे यांचे अभिनंदन," असं म्हणत शिंदेंनी सीबीएसएईच्या अभ्यास क्रमात शिवरायांच्या आयुष्यावर 21 पानांचा अभ्यासक्रम समाविष्ट करण्यात आल्याचं सांगितलं.
"विरोधकांनी केलेल्या चर्चेवर नजर टाकली तर काही ठोस हाती लागत नाही. ठोस चर्चा व्हायला हवी होती. मागील साडेतीन वर्षे झालेलं काम राज्यसमोर आहे. आधीच्या सरकारने टाकलेले गतिरोधक आम्ही हटवले. केलेल्या कामाची पोचपावती जनतेने विधानसभा निवडणुकीत दिली. ज्यांनी दोन दिवसाचं अधिवेशन घेतलं ते नागपूर अधिवेशनवत बोलतायत. त्यावेळी कोविड होता पण बाकी काही बोलत नाही. आप ने किया तो सही, हम ने किया तो अच्छा नहीं. अधिवेशन विदर्भात होत असताना विरोधकांनी पोटतिडकीने काही केलं नाही. सकाळी 9 वाजता सुरू झालेलं अधिवेशन रात्री दोनपर्यंत चाललं. आम्ही रात्री दोन वाजेपर्यंत सभागृह चालवलं तर काही दोन तास सभागृहात बसले," असं म्हणत शिंदेंनी थेट कोणाचंही नाव न घेता टीका केली. मात्र त्यांच्या टीकेचा रोख उद्धव ठाकरेंच्या दिशेने असल्याची चर्चा आहे.
नक्की वाचा >> राज्यात येणार सरकारी नोकऱ्यांचा पूर! फडणवीस विधानसभेत म्हणाले, 'पुढील दोन वर्षांत...'
"घरात नाही दाणा पण भले पाटील म्हणा. विरोधक फक्त विरोधी पक्षनेते पदाबाबत बोलायचे. काही जण फक्त बाहेर बळ दाखवतात, सभागृहात बोलत नाही. अंगात नाही बळ आणि चिमटा काढून पळ अशी काहींची स्थिती. आले आणि गेले. पर्यटनासाठी आले. एकही प्रश्न न विचारणारे सदस्य आपल्याकडे आहेत," असंही शिंदे म्हणाले.
पुढे बोलताना एकनाथ शिंदेंनी, "शेतकरी कर्जमाफी करणार म्हणजे करणारच," असा पुनरुच्चार सभागृहात केला. "काहीजण बांधावर गेले, फोटो काढून आले. मात्र आम्ही त्यांची दिवाळी काळी होऊ दिली नाही. सत्तेत येण्यापूर्वी दिलेला शब्द पाळणार, प्रिंटिंग मिस्टेक म्हणणार नाही," असा टोला शिंदेंनी थेट कोणाचंही नाव न घेता लगावला. त्यांच्या टीकेचा रोख मात्र उद्धव ठाकरेंच्या दिशेने होता.
नक्की वाचा >> ...तोपर्यंत मुंबई महाराष्ट्रातच राहणार! फडणवीसांनी हिवाळी अधिवेशनातील भाषणात स्पष्ट सांगितलं
शिंदेंआधी विधानसभेत भाषण देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही सरकारी योजना बंद करणार नाही असं स्पष्ट केलं. "अनेकांनी सरकारच्या योजनांवर शंका घेतली. निवडणूक झाली की योजना बंद करतील बोलले. कुठलीही योजना बंद होणार नाही. पाच वर्षे योजना सुरु राहतील," असं फडणवीसांनी स्पष्ट केलं. हीच भूमिका शिंदेंनी विधानपरिषदेत मांडली. मात्र ही भूमिका मांडताना त्यांनी हफ्ता वाढवून देणार असल्याचंही सांगितलं. सध्या 1500 रुपये प्रती महिना दिला जाणारा हफ्ता 500 रुपयांनी वाढवला जाणार आहे.
"कोणी माईका लाल आला तरी लाडक्या बहिणीची ओवाळणी बंद होणार नाही. 2100 रुपये देणार म्हटलं तर देणारच. मी कामावर बोलणारा नेता आहे," असं शिंदेंनी सभागृहात ठामपणे सांगितलं. माझं नाव घेतल्याशिवाय काहींचा दिवस सुरू होत नाही आणि संपतही नाही," असा टोला शिंदेंनी लगावला.
शशिकांत शिंदेंनी मध्येच, "19 डिसेंबरला मराठी माणूस प्रधानमंत्री होणार असं कळलंय. काही बदल होतोय का?" असा सवाल केला. यावर एकनाथ शिंदेंनी, "आम्ही खुर्चीसाठी काम करत नाही. तुम्ही आमचे हितचिंतक आहात. मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही असाच होतो, आता ही तसाच आहे. लोक मला डेडिकेटेड टू कॉमन मॅन अर्थात DCM म्हणतात," असं उत्तर दिलं.
स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.
...Read More|
NZ
(50 ov) 300/8
|
VS |
IND
306/6(49 ov)
|
| India beat New Zealand by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ENG
(97.3 ov) 384 (88.2 ov) 342
|
VS |
AUS
567(133.5 ov) 161/5(31.2 ov)
|
| Australia beat England by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
AUS
(45.2 ov) 152 (34.3 ov) 132
|
VS |
ENG
110(29.5 ov) 178/6(32.2 ov)
|
| England beat Australia by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.