काटोलमध्ये भाजपचे वर्चस्व मोडीत! तर सावनेरमध्ये भाजपचा एकहाती झेंडा; मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात कोणी मारणार बाजी?

Nagpur District Nagar Parishad And Nagar Panchayat Result 2025: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्ह्यात कुठे भाजपला धक्का, तर कुठे एकहाती झेंडा फडकवला आहे. 

नेहा चौधरी | Updated: Dec 21, 2025, 03:48 PM IST
काटोलमध्ये भाजपचे वर्चस्व मोडीत! तर  सावनेरमध्ये भाजपचा एकहाती झेंडा; मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात कोणी मारणार बाजी?

Nagpur District Nagar Parishad And Nagar Panchayat Result 2025 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्यात फार मोठा विजय मानला जात आहे. 15 पालिका आणि 12 नगर पंचायतीच्या निवडणुकीचे निकालाचे चित्र स्पष्ट झालं आहे. नागपूर जिल्ह्यात भाजपल मोठं बहुमत मिळालं असून 27 पैकी 26 जागांवर भाजपला घवघवीत यश मिळालं आहे. काटोलमध्ये भाजपचे वर्चस्व मोडीत काढण्यात अनिल देशमुख यांना यश आलं आहे. तर सावनेरमध्ये भाजपचा एकहाती झेंडा फडकला आहे. 

Add Zee News as a Preferred Source

काटोल विधानसभा मतदारसंघात माजी आमदार आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांनी आपली ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. काटोल नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) यांच्या संयुक्त उमेदवार अर्चना देशमुख यांनी बाजी मारली आहे. देशमुख यांना 2376 मत मिळाली आहे. याठिकाणी भाजपचे नेते चरणसिंग ठाकूर यांचा बाल्लेकिल्ला होता. हा बाल्लेकिल्लावर आता अर्चना देशमुख यांनी आपली सत्ता मिळवली आहे. 

काटोलमधील निकाल
भाजप- 13 
राष्ट्रवादी आणि शेकाप आघाडी- 12 

तर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामठी नगर पालिकेत भाजपला पहिल्यांदाच यश मिळालं आहे. तसंच सावनेर पालिकेत पुन्हा एकदा काँग्रेस नेते सुनील केदारला भाजपने धक्का देत, डॉ. आशिष देशमुख यांनी आपलं वर्चस्व दाखवून दिलं आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार संजना मगळे यांनी बाजी मारली आहे. त्यांना 3 हजारांपेक्षा अधिक मत मिळवले आहेत. सावनेर नगरपरिषदेत भाजपने एकूण 23 पैकी तब्बल 21 जागांवर विजय मिळवत मोठा विजय पटकावला आहे. 

विदर्भातील सर्व अपडेट एका क्लिकवर - Vidharbha Municipal Council Nagar Panchayat Election Result LIVE: नागपूर जिल्ह्यात भाजपला मोठं बहुमत; 27 पैकी 22 जागांवर विजय

नागपूर विजयी 

एकूण- 27

निकाल-26

आतापर्यंत नगराध्यक्ष पदावर विजयी - 

भाजप - 21
शिवसेना--02
राष्ट्रवादी-00

काँग्रेस - 1 

SP राष्ट्रवादी - 0
UBT-0

शेकाप -1 (राष्ट्रवादी शरद पवार  समर्थन)
गोंडवाना गंणतंत्र  - 1 
(काँग्रेस समर्थन)

नागपूर नगरपंचायत भाजप विजयी

1) मौदा   - भाजप- प्रसन्न तिडके 

2) कांन्द्री कन्हान - भाजप - सुजित पानतावणे

3) निलडोह - भाजप - भूमिका मंडपे,

4) येरखेडा - भाजप-  राजकिरण बर्वे, 

5) गोधनी - भाजप - रोशना कोलते, महिला

6) बेसा पिपळा - भाजप - कीर्ती बडोले

7) महादुला - भाजप हेमलता ठाकूर(सावजी)

8) बिडगाव - भाजप - विरु जामगडे, 

9) पारशीवनी - शिंदेंसेना - सुनीता डोमकी, 

10) भिवापूर- सुषमा शिरामे-भाजप

11) कोंढाळी-  योगेश चाफले, भाजप

12) बहादूरा---प्रतीक्षा खंडारे ,भाजप

नागपूर नगर परिषद 2025

1) कळमेश्वर नगर परिषद - अविनाश माकोडे - भाजप.

2) सावनेर नगर परिषद - संजना मंगळे - भाजप.

3) रामटेक नगर परिषद - बिकेंद्र महाजन-  शिवसेना

4) मोहपा - माधव चर्जन - काँग्रेस

5) काटोल - अर्चना देशमुख, शेकाप, राष्ट्रवादी.

6) बुट्टीबोरी - सुमित मेंढे, गोंडवाना गणतंत्र, कॉंग्रेस समर्थीत.

7) खापा - पियुष बोरडे, भाजप, 

8) उमरेड - प्राजक्ता कारू-भाजप

9) कन्हान पिंपरी -राजेंद्र शेंद्रे -भाजप

10) वाडी - नरेश चरडे-भाजप

11) वानाडोंगरी - सुनंदा बागडे-भाजप

12) डिगडोह - पूजा उके-भाजप

13) मोवाड -   दर्शना ढोरे- भाजप

14) नरखेड--  मनोज कोरडे, भाजपा

15 ) कामठी-- अजय अग्रवाल -भाजपा

आजचा विजय हा फार मोठा विजय, जनता महायुती आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत -चंद्रशेखर बावनकुळे 

महाराष्ट्रातील नगर परिषद आणि नगर पालिकांचे निकालाचे चित्र स्पष्ट झाले आहे. भाजपचा विजयानंतर चंद्रशेखर  बावनकुळे यांनी प्रतिक्रिया नोंदवली आहे. महाविकास आघाडीला जेवढे अपेक्षित केले होते तेवढे त्यांना यश मिळणार नाही.  जनता महायुतीच्या आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मागे उभी आहे. आजचा विजय हा फार मोठा विजय आहे. यापूर्वी कधीही यश मिळालं नाही तेवढं यश भाजपला यावेळी मिळालं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा मी अभिनंदन करतो. तसंच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी चांगली आघाडी प्राप्त केली आहे आणि ठाकरे शिवसेना काँग्रेसला नाकारलेला आहे. आम्ही काही कडवं आव्हान दिलेलं नाही, छोट्या निवडणुकीमध्ये आम्ही वेगळं लढण्याचा निर्णय घेतला मात्र सर्वांना चांगला यश मिळालेला आहे, हे भाजपला किंवा शिंदे यांच्या शिवसेनेला किंवा राष्ट्रवादीला आव्हान नाही. काँग्रेसला विचार मंथन करण्याची गरज आहे. नागपूर जिल्ह्यात भाजपला चांगला यश मिळालेला आहे. सर्व मतदारांचा नागरिकांचा अभिनंदन करतोय. शिवसेना मित्र पक्ष आहे आम्ही सांगून लढलो आहे, अनपेक्षित निकाल आम्हाला काटोलचा आलेला आहे. नागपूर जिल्ह्यात मोठा बहुमत मिळालेला आहे.

About the Author

Neha Choudhary

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला,  26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे. 

...Read More