Nagpur Municipal Corporation Election 2026 : महाराष्ट्रात आज लोकशाहीचा उत्साह सुरु आहे. पण नागपुरात मतदानाच्या पूर्वसंध्येला प्रभाग 11 मधील भाजपचे उमेदवार आणि माजी नगरसेवक भूषण शिंगणे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. यात त्यांचा हात फ्रॅक्चर झाला आहे, तर चेहऱ्या आणि पायला गंभीर दुखापत झाली आहे. भाजप शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी काँग्रेस उमेदवार चाचेरकर आणि काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान घटनेची माहिती मुख्यमंत्र्यांना मिळाल्यानंतर त्यांनी पोलीस आयुक्तांना हल्लेखोरांवर तात्कार कारवाईची मागणी केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते - केंद्रीय मंत्री नितीन यांनी भूषण यांच्या घरी जाऊन तब्येतीची विचारपूस केली. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, आमचे उमेदवार भूषण शिंगणे यांच्यावर काँग्रेस पक्षाच्या काही लोकांनी भ्याड हल्ला केला. त्यांचा हात फ्रॅक्चर झाला, डोकं फोडलं...याबद्दल निषेध असून तुम्ही लोकशाहीमध्ये निवडून येत नाही म्हणून ठोकशाही करायची हे योग्य नाही त्यांनी किती हल्ले केले तरी त्याचा परिणाम होणार नाही, या शब्दात त्यांनी विरोधकांवर सुनावणे.
ते पुढे म्हणाले की, या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून पोलिसांना इंटेमिशन असूनही त्यांनी कारवाई का केली नाही याची चौकशी होणार असल्याचेही मुख्यमंत्री यांनी सांगितलं. नागपूरमध्ये काँग्रेस पक्षाने अतिशय नामचीन गुंडांना तिकीट दिल्याचा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केला आहे. ते म्हणाले की, अशातल्या एका गुंडाने भूषण शिंगणे यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. त्यांच्यावर गाडी चढवण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात अजून काही जण जखमी झाले आहेत. नागपुरात खूप मोठ्या प्रमाणात दहशत पसरवली आहे. कुठल्याही दहशतीला आमचा पक्ष आणि कार्यकर्ते घाबरणार नाही. जनता मतपेटीतून उत्तर दिईल आणि अशा प्रवृत्तींना खपवून घेणार नाही, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला.
भारतीय जनता पक्षाचा कुठलाही कार्यकर्ताला अशाप्रकारे कोणी हात लावण्याचा प्रयत्न केला तर आम्ही सोडणार नाही, तर शंभर टक्के आम्ही नेस्तनाबूत करू, या शब्दात मुख्यमंत्र्यांनी सुनावले.
यावेळी दुबार मतदारांच्या आरोपांवर फडणवीस म्हणाले, “दुबार मतदार शोधण्याचं काम इलेक्शन कमिशनने करेल. आत बसलेल्या एजंटने त्यावर आक्षेप घ्यायला हवा. कोणी दुबार मतदान केलं तर आम्हीही त्यावर आक्षेप घेऊ. पण हे मारामारी करणारे कोण आहेत. मतदान कमी झालं पाहिजे, याकरिता केलेला हा प्रयत्न आहे.”
नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे.
...Read More|
SA
(20 ov) 213/4
|
VS |
CAN
156/8(20 ov)
|
| South Africa beat Canada by 57 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
OMA
(19.5 ov) 103
|
VS |
ZIM
106/2(13.3 ov)
|
| Zimbabwe beat Oman by 8 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
SCO
(20 ov) 207/4
|
VS |
ITA
134(16.4 ov)
|
| Scotland beat Italy by 73 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.