Viral Video : सध्या राज्याच्या राजकारणात दोन भावंडांची प्रचंड चर्चा आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे त्यांच्या प्रत्येक हालचालींवर सर्वांचे बारीक लक्ष आहे. पण सध्या राजकारणातील भावांची नाही तर विदर्भातील या जंगलातील दोन भावांनी लक्ष वेधलं आहे. गोठणगाव मधील F 2 वाघीणीचे दोन बछडे...
संपूर्ण जगभरातून पर्यटक F2 वाघिणीच्या आणि तिच्या पाच बछड्यांना पाहण्यासाठी उमरेड क-हाडला अभयारण्यात धाव घेत आहे. त्यातही N4 वाघ आणि F2 वाघीणचे या दोन बछड्यांची मस्ती सगळ्यांच्याच आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. त्यांच्यातील टशन आणि मस्ती पर्यटकांना भुरळ टाकत आहे. साधारणतः 14 महिन्यांचे हे दोघ वाघ मस्ती करताना शिकार करतानाचं ट्युनिंग ही जबरदस्त आहे.
त्यांच्या मस्तीची ही दृश्य टिपली आहे वन्यजीव प्रेमी आणि वाईल्ड लाईफ फोटोग्राफर संदीप गुजर यांनी काढली आहे. पावसाळा, हिवाळा किंवा उन्हाळा विदर्भातील ताडोबा, पेंच आणि उमरेड-कऱ्हांडला अभयरण्यात वाघिण आणि वाघांसह बछड्यांना पाहिण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक गर्दी करतात. सध्या उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील बछड्यांनी सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
या मस्तीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. आईसोबत हे तीनही बछडे दंगामस्ती करत आहे. तर या वाघांच्या दर्शनानं पर्यटक सुखावलेत.
नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे.
...Read More|
ENG
(20 ov) 202/7
|
VS |
ITA
178(20 ov)
|
| England beat Italy by 24 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
UAE
(20 ov) 160/9
|
VS |
AFG
162/5(19.2 ov)
|
| Afghanistan beat United Arab Emirates by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
IND
(20 ov) 175/7
|
VS |
PAK
114(18 ov)
|
| India beat Pakistan by 61 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.