अमर काणे, झी मीडिया, नागपूर: काटोल तालुक्यातील राऊळगाव येथील ‘एसबीएल एनर्जी लिमिटेड’ या स्फोटक कंपनीत सकाळी झालेल्या भीषण स्फोटात 17 कामगारांचा मृत्यू झाला. तर 18 कामगार गंभीर जखमी झाले. मृतक व जखमींमध्ये बहुतांश महिलांचा समावेश आहे. मृतांचा आकडा वाढवण्याची शक्यता आहे. या घटनेची दाहकता इतकी होती की आजुबाजूच्या गावांमध्येदेखील स्फोटाचे हादरे जाणवले. महत्त्वाचं म्हणजे बाजार गाव काटोल दरम्यान असलेल्या स्फोटक आणि बारूद कंपन्यांमध्ये होणाऱ्या स्फोटांच्या घटनांमुळे कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय.
नागपुरात झालेल्या या स्फोटानंतर SBL कंपनीच्या कारभारावर बोट ठेवण्यात आलाय.
‘एसबीएल एनर्जी लिमिटेड’ या कंपनीकडे प्रामुख्याने डेटोनेटर्स उत्पादनाचे काम होतं. या कंपनीत आजुबाजूच्या गावांमधील महिला प्रामुख्यानं कामाला आहेत. सकाळच्या शिफ्टमध्ये शेकडो कामगार कामावर आले होते. ‘नोनल क्रिम्पिंग’ या युनिटमध्ये
‘डेटोनेटर्स सेल’च्या पॅकिंगचे काम सुरू होतं. दरम्यान, सकाळी सात वाजताच्या सुमारास जोरदार स्फोट झाला आणि काही कळायच्या आतच आगीचे लोळ उडाले.
याआधीही स्फोटकं बनवणाऱ्या कंपन्यांमध्य़े स्फोटाचे प्रकार घडलेत. मात्र कंपनी सुरक्षेची पुरेशी काळजी घेत नसल्यामुळेच स्फोट झाल्याचा आरोप महाराष्ट्र बारुद कामगार संघटनेचे उपाध्यक्ष पियुष फिस्ट यांनी केलाय. तसेच मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलीय. सर्व कंपन्यांचं ऑडिट झालं पाहिजे सुरक्षा तपासणी होईपर्यंत कंपन्या बंद ठेवा अशी मागणीही वडेट्टीवार यांनी केलाय. तर मृत्यू झालेल्या प्रत्येक कामगाराला 50 लाखांची मदत देण्याची मागणी वडेट्टीवार यांनी केलीय. तसेच, ‘एसबीएल कंपनीतील स्फोटानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुख व्यक्त करत सखोल चौकशीचे आदेश दिलेत.
| 4 सप्टेंबर 2023 | सोलार एक्स्प्लोझिव्ह कंपनीत स्फोट | 2 कामगारांचा मृत्यू |
| 17 डिसेंबर 2023 | सोलार कंपनीत स्फोट | 9 जणांचा मृत्यू |
| 13 जून 2024 | चामुंडा बारूद कंपनीत स्फोट | 8 जणांचा मृत्यू |
| 16 फेब्रुवारी 2025 | एशियन फायर वर्क कंपनीत स्फोट | 2 कामगारांचा मृत्यू |
| 4 सप्टेंबर 2025 | सोलार एक्स्प्लोझिव्ह कंपनीत स्फोट | 2 कामगारांचा मृत्यू |
| 1 मार्च 2026 | SBL कंपनीत स्फोट | 17 कामगारांचा मृत्यू (मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता) |
स्फोटक तयार करणाऱ्या कंपन्यांमध्ये वारंवार होणाऱ्या स्फोटांच्या घटनांमुळे कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. शासनाने याबाबत आता कठोर नियमावली बनवत पावलं उचलण्याची गरज आहे.
सध्या 'झी 24 तास डिजिटल'मध्ये कॉन्टे्ट रायटर म्हणून इंटर्नशिप करत आहे. याआधी 'सकाळ मीडिया' ग्रुपमध्ये (जानेवारी २०२४ - एप्रिल २०२४) एंटरटेनमेंट बीटचा भाग म्हणून इंटर्नशिप केली आहे, जिथे मराठी मनोरंजन बातम्या, सेलिब्रिटी अपडेट्स आणि डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी जीवनशैली सेक्शनमध्ये कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. नंतर, 'साम टीव्ही मराठी'मध्ये (जुलै २०२५ - सप्टेंबर २०२५) डिजिटल न्यूजरूम (लाइफस्टाइल बीट) मध्ये देखील इंटर्नशिप केली, जिथे मराठीमध्ये आकर्षक जीवनशैली कॉन्टेन्ट तयार केले, CMS आणि Google Workspace सह काम करायला शिकले आणि डिजिटल सामग्री वर्कफ्लोमध्ये अनुभव मिळवला.
...Read More|
ZIM
(20 ov) 153/7
|
VS |
SA
154/5(17.5 ov)
|
| South Africa beat Zimbabwe by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
PAK
(20 ov) 212/8
|
VS |
SL
207/6(20 ov)
|
| Pakistan beat Sri Lanka by 5 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
(20 ov) 159/7
|
VS |
ENG
161/6(19.3 ov)
|
| England beat New Zealand by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.