योगेश खरे, झी मीडिया, नाशिक: नाशिक महापालिकेच्या स्थायी समिती निवडणुकीनंतर आता स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपकडे स्वीकृत नगरसेवक पदासाठी तब्बल पाचशे इच्छुकांनी दावेदारी केली असून पक्ष कार्यालयातील रजिस्टर नावांनी भरल्याची माहिती समोर आली आहे. संघटनेतील पदाधिकारी, पराभूत उमेदवार आणि सामाजिक संस्थांमध्ये काम करणारे कार्यकर्ते देखील या स्पर्धेत उतरले आहेत.
नाशिक महापालिकेत एकूण दहा स्वीकृत सदस्यांची निवड होणार असून त्यात भाजपच्या वाट्याला सहा जागा मिळण्याची शक्यता आहे. या पदासाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ आणि जाणकार व्यक्तींना संधी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात असली तरी प्रत्यक्षात राजकीय कार्यकर्त्यांनाच संधी मिळते. स्वीकृत नगरसेवकपदासाठी सामाजिक संस्थांमधील कामाचा अनुभव हा महत्त्वाचा निकष मानला जातो. त्यामुळे अनेक इच्छुकांनी गणेश मंडळे किंवा सामाजिक संस्थांच्या माध्यमातून अनुभव दाखवत कागदपत्रे सादर केली आहेत. तीन वर्षांचे ऑडिट आणि इतर कागदपत्रे पूर्ण करून इच्छुकांनी दावेदारी मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
महापालिका निवडणुकीवेळी भाजपकडे सुमारे एक हजार अर्ज आले होते. त्यापैकी 118 जणांना उमेदवारी देण्यात आली होती. उमेदवारी न मिळालेल्या अनेक इच्छुकांना स्वीकृत नगरसेवकपदाची संधी दिली जाईल, असे आश्वासन देण्यात आल्याचा काहींचा दावा आहे. त्यामुळे आता इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र त्याची पात्रता म्हणजे तो चांगला असावा अशी कोपरखळी त्यांनी मारलीय.
भाजपकडून याच महिन्यात स्वीकृत नगरसेवकांची निवड होण्याची शक्यता व्यक्त केली जात असली तरी इच्छुकांची मोठी संख्या लक्षात घेता संघर्ष टाळण्यासाठी निवड प्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे.
सध्या 'झी 24 तास डिजिटल'मध्ये कॉन्टे्ट रायटर म्हणून इंटर्नशिप करत आहे. याआधी 'सकाळ मीडिया' ग्रुपमध्ये (जानेवारी २०२४ - एप्रिल २०२४) एंटरटेनमेंट बीटचा भाग म्हणून इंटर्नशिप केली आहे, जिथे मराठी मनोरंजन बातम्या, सेलिब्रिटी अपडेट्स आणि डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी जीवनशैली सेक्शनमध्ये कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. नंतर, 'साम टीव्ही मराठी'मध्ये (जुलै २०२५ - सप्टेंबर २०२५) डिजिटल न्यूजरूम (लाइफस्टाइल बीट) मध्ये देखील इंटर्नशिप केली, जिथे मराठीमध्ये आकर्षक जीवनशैली कॉन्टेन्ट तयार केले, CMS आणि Google Workspace सह काम करायला शिकले आणि डिजिटल सामग्री वर्कफ्लोमध्ये अनुभव मिळवला.
...Read More|
LES
(19.3 ov) 60
|
VS |
BOT
61/4(11 ov)
|
| Botswana beat Lesotho by 6 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
IND
(20 ov) 255/5
|
VS |
NZ
159(19 ov)
|
| India beat New Zealand by 96 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
BRN
(20 ov) 130/7
|
VS |
MAS
128(19.5 ov)
|
| Bahrain beat Malaysia by 2 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.