नाशिक - देवाच्या दारातच भक्ताला कपडे फाटेपर्यंत मारहाण, त्र्यंबकेश्वर मंदिरात लाथा बुक्क्यांनी तुडवलं, VIDEO व्हायरल

Nashik Trimbakeshwar Temple: नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात एका भक्ताला बेदम मारहाण कऱण्यात आली आहे. सुरक्षारक्षकांकडून भक्ताला कपडे फाटेपर्यंत मारहाण करण्यात आली. मोबाईल कॅमेऱ्यात हा सगळा प्रकार कैद झाला आहे.   

शिवराज यादव | Updated: Mar 2, 2026, 09:54 AM IST
नाशिक - देवाच्या दारातच भक्ताला कपडे फाटेपर्यंत मारहाण, त्र्यंबकेश्वर मंदिरात लाथा बुक्क्यांनी तुडवलं, VIDEO व्हायरल

Nashik Trimbakeshwar Temple: नाशिकमध्ये देवाच्या दारातच भक्ताला अत्यंत वाईट वागणूक देण्यात आली आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भक्ताला बेदम मारहाण कऱण्यात आली आहे. सुरक्षारक्षकांकडून भक्ताला कपडे फाटेपर्यंत मारहाण करण्यात आली. मोबाईल कॅमेऱ्यात हा सगळा प्रकार कैद झाला असून यानंतर संतापाची लाट आहे. 

Add Zee News as a Preferred Source

रविवारी त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात पुन्हा एकदा भाविकाला सुरक्षारक्षकांकडून मारहाण करण्यात आली आहे. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात भाविकाला सुरक्षारक्षकांकडून मारहाण झाली. सुरक्षारक्षकांनी कपडे फाटेपर्यंत मारहाण करत भाविकाला मंदिराबाहेर काढलं. 

व्हिडीओत दिसत आहे त्यानुसार, मंदिरातील सुरक्षारक्षक भाविकावर तुटून पटले आहेत. त्याला कानाखाली, लाथा-बुक्क्यांनी मारत आहेत. मारहाण इतकी बेदम आहे की, त्याचे कपडेही फाटल्याचं दिसत आहे. यादरम्यान इतर भाविक आश्चर्याने पाहत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ZEE 24 TAAS (@zee24taas)

मिळालेल्या माहितीनुसार, भाविक गाभाऱ्यात दर्शन रांगेमध्ये अडून बसला होता. सुरक्षारक्षकांवर मुजोरी करत होता त्यामुळेच हा वाद झाला. दरम्यान याप्रकरणी पोलिसात कुठलीही तक्रार नसल्याने भाविक कोण याची माहिती अद्याप मिळालेला नाही. 

दरम्यान दर्शन रांगेत केवळ काही क्षण दर्शन मिळत असल्याने भाविक नाराजी व्यक्त करत आहेत. प्रशासनाकडून योग्य नियोजन करण्याची अपेक्षा केली जात आहे. 

त्र्यंबकेश्वरमध्येच पत्रकारांना झाली होती मारहाण

याआधी त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांना मारहाण करण्यात आली होती. आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर साधू-महंतांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या निमित्ताने पत्रकार तिथे पोहोचले होते. यादरम्यान त्र्यंबकेश्वर येथील स्वामी समर्थ कमानीजवळ प्रवाशी गाड्यांच्या पावत्या फाडणाऱ्या चार ते पाच जणांच्या टोळक्याने पत्रकारांवर हल्ला केला होता.
 
त्र्यंबकमध्ये स्वामी समर्थ कमानीजवळ काही मुलं वाहनांकडून पावत्या फाडून पैसे घेत होते. त्र्यंबकमध्ये होणाऱ्या साधू-महंत यांच्या बैठकीच्या वार्तांकनासाठी पत्रकार पोहोचले होते. मुलांनी त्यांच्या गाड्या अडवल्या आणि पैसे मागण्यास सुरुवात केली. पत्रकारांनी आम्ही बैठकीच्या वार्तांकनासाठी आल्याचं सांगितलं. यावेळी पावती फाडणाऱ्यांनी तुम्ही कोणीही असला तरी आम्ही गाड्या सोडणार नाही असं सांगितलं. 

गोंधळ झाल्यानंतर वसुली करणाऱ्यांनी इतर साथीदारांसह पत्रकारांना बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत एक पत्रकार गंभीर जखमी झाला होता. तसंच दोन जण जखमी होते. रुग्णालयात उपाचारानंतर त्यांना सोडण्यात आलं होतं. या मारहाण प्रकरणी त्र्यंबक पोलीस ठाण्यात (Trimbak Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसंच तिघांना अटक करण्यात आली. 

About the Author

Shivraj Yadav

शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी  टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे. 

...Read More