नाशिकमध्ये महिलेने दिला तब्बल 14 मुलांना जन्म; 14 पैकी 6 मुलांना तिने... महाराष्ट्रातील धक्कादायक प्रकार

महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका महिलेने 14 मुलांना जन्म दिला. 6 मुलांसोबत या महिलेने धक्कादायक कृत्य केले.  

वनिता कांबळे | Updated: Dec 9, 2025, 10:40 PM IST
नाशिकमध्ये महिलेने दिला तब्बल 14 मुलांना जन्म; 14 पैकी 6 मुलांना तिने... महाराष्ट्रातील धक्कादायक प्रकार

Nashik Crime News : नाशिकमध्ये एक महिलेने 2 किंवा 3 नाही तर तब्बल 14 मुलांना जन्म दिला. वयाच्या 45 व्या वर्षी ही महिला 14 मुलांची आई बनली. मात्र, याच आईने 14 मुलांसोबत तिने धक्कादायक कृत्य केले. महिलेच्या या कृत्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. सामाजिक कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे या महिलेचे भयानक कृत्य जगासमोर आले आहे.   

Add Zee News as a Preferred Source

नाशिकच्या त्रंबकेश्वर तालुक्यातील टाके देवगाव पैकी बरड्याची वाडी या गावात राहणाऱ्या एका 45 वर्षीय महिलेने तब्बल 14 मुला मुलींना जन्म दिला. मात्र या महिलेने घरची परिस्थिती हलाकीची असल्याने या 14 मुला मुलींपैकी 6 मुल आणि मुली विकल्याची धक्कादायक माहिती समोरं आली आहे.  नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाके देवगाव या आदिवासी बहुल भागातील भरड्याची वाडी या गावात ही महिला राहते.  या 45 वर्षीय महिलने तब्बल 14 मुला मुलींना जन्म देत यापैकी तब्बल 6 हून अधिक मुला मुलींची पैशासाठी विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

10 ऑक्टोबर 2025 ला महिलेला मुलगा झाला.  या अपत्याच वजन कमी असल्याने आरोग्य विभागाने या अपत्याच्या तपासणीसाठी आशा कर्मचाऱ्यांना या महिलेच्या घरी पाठवले. मात्र या महिलेच्या घरी अशा कर्मचारी गेल्यानंतर या महिलेने तिचं पोटचा बाळ विकल्याच सांगितलं आणि त्यानंतर या सगळ्या प्रकाराचं बिंग फुटला आहे. पैशासाठी मुलांची विक्री केल्याच्या या घटनेचा शोध घेण्यासाठी  नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाकी देवगावचा बाराड्याची वाडी येथे सामजित कार्यकर्ते पोहचले.  मात्र, ही महिला आणि तिचा नवरा घरातून फरार झाले. यावेळी घरात असलेल्या या महिलेच्या इतर मुलांकडून या सगळ्या प्रकाराबाबत माहिती जाणून घेतली तेव्हा या मुलांनी जी माहिती दिली ती धक्कादायक होती आमच्या आई-वडिलांनी दहा हजार रुपये साठी आमच्या भावाला विकलं एका भावाला शहापूरला तर एका भावाला जवळच असलेल्या नातेवाईकाला मुलगा होत नसल्यान विकलं अशी माहिती दिली. तर सामाजिक कार्यकर्ते भगवान मधे यांनी या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

 

About the Author

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे.  याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.

...Read More