Ashok Kharat Case: शिर्डीत गाजत असलेल्या गुन्ह्याच्या तपासात आता धक्कादायक वळण समोर येत आहे. खरातचा मोबाईल डेटामधून धक्कादायक माहिती उघड होत आहे.

Ashok Kharat Case: शिर्डीत गाजत असलेल्या गुन्ह्याच्या तपासात आता धक्कादायक वळण समोर येतंय.. भोंदू अशोक खरात तपासावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत होता का? असा सवाल उपस्थित केला जातोय. कारण खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर केल्यानंतर फिर्यादी तरुणीसोबत चॅट समोर आलंय. यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झालेत.
18 फेब्रुवारीला शिर्डी पोलीस ठाण्यात 24 वर्षीय तरुणीने नीरज जाधव विरोधात गुन्हा दाखल केला. सोशल मीडियावर आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याने ही तक्रार करण्यात आली होती. राज्य महिला आयोगानेही या प्रकरणाची दखल घेतली आणि शिर्डी पोलिसांना नोटीस बजावली. तपास सुरू होता. पोलिसांनी फिर्यादीची सविस्तर चौकशी केली.
मात्र इथेच घडली धक्कादायक बाब घडली. गोपनीय चौकशीतील माहिती थेट भोंदूपर्यंत म्हणजे अशोक खरातपर्यंत पोहोचली होती. फिर्यादी तरुणी आणि अशोक खरात यांच्यात थेट संपर्क होता. पोलिस तपासातील माहितीची देवाणघेवाण होत होती. यामुळेच तपासावर प्रभाव टाकण्याचा संशय व्यक्त होत आहे.
11 मार्चला खरातने फिर्यादी तरुणीला मेसेज पाठवला. पोलीस अधिकाऱ्यांना भेटू नका, काल अधिकाऱ्यांनी तुमचा छळ केला. आता पोलीसच दाखवून देतील ते कायदेशीर आहे. यापुढे मी बघतो असं त्याने म्हटलं. हा मेसेज पोलिसांनी मोबाईल रिकव्हर केल्यानंतर समोर आला.
याच काळात महिला आयोगाने शिर्डी पोलिसांना सुनावणीसाठी बोलावलं. 17 मार्चला महिला आयोगात सुनावणी पार पडली. नीरज जाधवला अटक का केली नाही? हा थेट सवालच यावेळी महिला आयोगाने केला. आणि त्याच रात्री नाशिक पोलिसांनी अशोक खरातला अटक केली.
दरम्यान आता खरातच्या मोबाईलमधून अनेक गुपितं बाहेर येण्याची शक्यता आहे. फिर्यादीशी संपर्क, तपासातील माहितीची देवाणघेवाण आणि अटकेसाठी दबाव, या सगळ्यामुळे प्रश्न अधिकच गंभीर झाले आहेत.
खरातने राजकीय प्रभाव वापरला का? कोणते मोठे चेहरे त्याच्या संपर्कात होते का? याचाही तपास आता पुढे होईल. एक मोबाईल, काही मेसेज आणि तपासाला लागलेलं वादळ. चौकशी जसजशी पुढे सरकेल तसतसं हे गूढ उलगडत जाणार आहे.