Ashok Kharat Wife in Court: कल्पना खरातच्या वकीलांनी तिची बाजू कोर्टात मांडली. खरातच्या गंभीर गुन्ह्यांची कबुली देखील तिनं दिली.

Ashok Kharat Wife in Court: अशोक खरातची पत्नी कल्पना खरातच्या अटकपूर्व जामिनावर आज कोर्टात सुनावणी झाली. दरम्यान यावेळी खरातच्या गुन्ह्यांशी आपला कोणताही संबंध नसल्याचं कल्पना खरातनं म्हटलं आहे. कल्पना खरातच्या वकीलांनी तिची बाजू कोर्टात मांडली. खरातच्या गंभीर गुन्ह्यांची कबुली देखील तिनं दिली.
नाशिकचा भोंदू अशोक खरातच्या पत्नीच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण झाली असून खरातची पत्नी कल्पना खरातनं पतीच्या काळ्या कारनाम्यांची कबुली दिलीय. कल्पना खरातच्या वकीलांनी राहता न्यायालयात युक्तिवाद करत तिची बाजू मांडली, कल्पना खरातनं तिचा पती भोंदू अशोक खरातला त्याच्या गुन्ह्यात साथ दिली असल्याचं समोर आलं आहे, बँकेतील बनावट खाती आणि जमीन गैरव्यवहारात तिचा हात असल्याचं समोर आलं आहे, मात्र खरातच्या कोणत्याही कामात कल्पना खरातचा संबंध नसल्याचं तिच्या वकीलांनी म्हटलं आहे.
कल्पना खरातच्या वकिलांचा युक्तिवाद
माझ्या पतीने केलेले गुन्हे गंभीर आहेत
पतीने केलेल्या गुन्ह्यांशी माझा संबंध नाही
पती तुरुंगात आहेत, कधी बाहेर येतील माहिती नाही
न्यायालयाने रोज हजेरीला येण्याची विनंती केली तरी मी येईल
आमच्या संपूर्ण मालमत्ता जप्त केल्या आहेत
मी आयकर विभागाला संपूर्ण आयकर भरते
शिवसंकल्प हार्डवेअर हा माझा व्यवसाय
पतीच्या कुठल्याही व्यवहाराला समक्ष हजर नव्हते
बँकेत खातं माझ्या नावावर, ते पती ऑपरेट करत होते
दरम्यान सरकारी वकीलांनी कल्पना खरातच्या वकीलांचे दावे फेटाळले आहेत. त्यांनी म्हटलं की, अशोक खरातच्या व्यवहारात कल्पना खरातचा प्रत्यक्ष सहभाग होती. जमीन खरेदीच्या कागदपत्रांवर कल्पना खरातची सही आणि अंगठा आहे. तसंच, मुक्त्यारपत्रात दर तीन महिन्याला 2 टक्के व्याज देण्याचा उल्लेख आहे. कल्पना खरातच्या खात्यामधून फिर्यादीला मोठ्या प्रमाणात रक्कम हस्तांतरित करण्यात आली.
या व्यवहारात जितेंद्र शेळके, महेंद्र शेळके तसंच इतर साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आलं असून, आरोपींकडे सावकारी परवाना नसल्याचंही तपासात समोर आल्याचं सरकारी वकिलांनी नमूद केलं आहे.
सदर गुन्ह्याचे तपासी अधिकारी निवांत जाधव यांनी कोर्टात माहिती देताना सांगितले की, कल्पना खरात यांच्या खात्यातून तब्बल सात कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत. त्या कोणत्याही नोकरीत नसताना किंवा व्यवसाय नसताना इतका मोठा आर्थिक व्यवहार कसा झाला, हा तपासाचा मुद्दा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अशोक खरात यांच्या सुमारे 40 टक्के मालमत्तेमध्ये कल्पना खरात भागीदार असल्यामुळे त्यांना या व्यवहारांची पूर्ण माहिती होती, असा युक्तिवादही सरकारी पक्षाकडून करण्यात आला आहे, त्यामुळे कल्पना खरातनं गुन्ह्यात सहभाग नसल्याचं सांगितलं असलं तरी त्यांच्याविरोधात गुन्ह्यांची नोंद आहे, त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे.