BJP Supporters upset with party in Nashik: नाशिकमध्ये भाजपा कार्यकर्ते आपल्याच पक्षाच्या नेतृत्वावर नाराज झाले आहेत. पक्षात होणारे काही प्रवेश या नाराजीसाठी कारणीभूत ठरले आहेत. नाशिकचे दोन माजी महापौर भाजपच्या गळाला लागले असून, विनायक पांडे, यतिन वाघ हे दोन्ही नेते भाजपात प्रवेश करणार आहेत. विनायक पांडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे (Shivsena UBT) दिग्गज नेते आहेत. याशिवाय काँग्रेसचे शाहू खैरे हेदेखील भाजपात प्रवेश कऱणार आहेत. या पक्षप्रवेशांना भाजपा कार्यकर्त्यांकडून स्पष्ट विरोध केला जात आहे. नाशिकमध्ये पक्षाच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्ते जमा झाले आहेत. यानंतर तिथे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे आज भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपाचा सुपडा साफ करू असं सांगणारे विनायक पांडे अवघ्या 24 तासात भाजपात सामील झाले आहेत. आता ते गिरीश महाजन यांना देणार साथ देताना दिसणार आहेत. पक्षश्रेष्ठींवर नाराज असल्यामुळे भाजपात प्रवेश करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
"चार-पाच दिवसांपूर्वी मी संजय राऊतांशी बोललो, माझा मुलगा इच्छुक आहे सांगितलं. तर मला म्हणाले मी पाहतो. त्यांचं काहीच उत्तर आलं नाही. जर इतक्या वरिष्ठ कार्यकर्त्याला अशी वागणूक मिळत असेल, त्यामुळे मी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला," असं विनायक पांडे यांनी सांगितलं.
नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे, यतिन वाघ हे दोन्ही नेते भाजपात प्रवेश करणार आहेत. विनायक पांडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे (Shivsena UBT) दिग्गज नेते आहेत. याशिवाय काँग्रेसचे शाहू खैरे हेदेखील भाजपात प्रवेश कऱणार आहेत.
मात्र या पक्षप्रेवशामुळे भाजपामध्ये नाराजीचे वारे वाहू लागले आहेत. हिंदुत्वाच्या तत्वाविरोधात प्रवेश दिले जात असल्याने नेतृत्वविरोधात नाराजी व्यक्त होत आहे. निवडणूक प्रमुख आमदार देवयानी फरांदे यांनी तर फेसबुकला पोस्ट शेअर करत नाराजी बोलून दाखवली आहे. भाजप कार्यालयाबाहेर पक्षनिष्ठा असलेल्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली असून, आपली नाराजी बोलून दाखवली आहे. प्रवेश दिल्यास भाजपमध्ये दुफळी निर्माण होऊ शकते. "याला फक्त पैसा कारणीभूत आहे. पैशाशिवाय राजकारणात काही नाही. घरातील पैसे खर्च करुन मी पक्षासाठी वेळ दिला आहे. 1989 सालापासून काम करत आहे. जी पदं दिली ती घेतली आणि न्याय दिला. आता जर दुसऱ्या पक्षातील येऊन आमच्यावर अन्या करत असतील तर कदापि सहन करणार नाही. योग्य तो न्याय दिला पाहिजे," असं महिला कार्यकर्ता म्हणाल्या आहेत.
“प्रभाग क्रमांक १३ मध्ये होणाऱ्या आजच्या प्रवेशाला माझा स्पष्ट विरोध आहे. तसेच प्रस्थापितांच्या विरोधात ठामपणे लढा देणाऱ्या हिंदुत्ववादी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मी खंबीरपणे पाठीशी आहे. सदर विषयाबाबत निवडणूक प्रमुख म्हणून मला कोणतीही विचारणा करण्यात आलेली नाही,” असं आमदार देवयानी फरांदे यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे.
युतीची घोषणा झाल्यानंतर दुपारी 1 वाजेपर्यंत नाचत होते. मलाही आश्चर्य वाटत आहे. काल दुपारपर्यंत गुलाल उधळत, भगवा हवेत फिरवत शिवसेना-ननसे युती झाली म्हणून हे लोक जल्लोष करत होते. कसा कोणवार विश्वास ठेवायचा अशी खंत संजय राऊतांनी व्यक्त केली आहे.
संजय राऊत यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत विनायक पांडे आणि यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी करत असल्याचं जाहीर केलं आहे. "पक्षविरोधी कारवायांबद्दल नाशिक शिवसेनेचे विनायक पांडे आणि यतिन वाघ यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात येत आहे! जय महाराष्ट्र!," असं त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे.
शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे.
...Read More|
ENG
(97.3 ov) 384 (88.2 ov) 342
|
VS |
AUS
567(133.5 ov) 161/5(31.2 ov)
|
| Australia beat England by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
AUS
(45.2 ov) 152 (34.3 ov) 132
|
VS |
ENG
110(29.5 ov) 178/6(32.2 ov)
|
| England beat Australia by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
IND
(20 ov) 231/5
|
VS |
SA
201/8(20 ov)
|
| India beat South Africa by 30 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.