Devendra Fadnavis on Ashok Kharat: अशोक खरातच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. विधानसभेत त्यांनी अशोक खरात प्रकरणात निवेदन दिलं. या निवेदनात खरातशी संबंधित असलेल्या सगळ्या ट्रस्टची चौकशी केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी अशोक खरातकडे नेमकी किती संपत्ती आहे याचा उलगडा करताना कुंडलीच वाचून दाखवली. यासह त्याने आतापर्यंत कोणत्या देशांमध्ये प्रवास केला आहे याची यादीच वाचून दाखवली.
आरोपी अशोक खरात याचे श्री शिवनिका संस्थान, मिरगांव, ता. सिन्नर, जि. नाशिकमधील कार्यकारी संचालक मंडळाची सखोल चौकशी करत आहोत. तसंच अशोक खरात याचे काही संस्थान असतील तर त्या संस्थानची व त्यावरील कार्यकारी मंडळातील सदस्यांची सखोल चौकशी करत आहोत असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.
- मिरगाव येथे 33 एकर जमीन
- मिरगावात फार्महाऊस
- पाथर्डी गाव 10 एकर जमीन
- सिन्नरमध्ये 6 एकर जमीन
- अहिल्यानगरमध्ये 4.5 एकर जमीन
- काकडी तालुका शिर्डी विमानतळ 5.5 एकर जमीन
- पाथर्डी फाटा प्लॉट
- ओझर जिल्हा नाशिक 4 गुंठ्याचे 3 प्लॉट
- पनवेल 40 गुंठे प्लॉट
- कॅनडा कॉर्नर नाशिक ऑफिस 180 स्क्वेअर फूट
- संगमनेर मुलीच्या नावावर 11 गुंठे प्लॉट
- पुणे मुलीच्या नावावर प्लॉट,
- नाशिक कर्मयोगी नगर बंगला
- शिर्डी तालुका राहता साई सिल्व्हर ओक मंगल कार्यालय
- सिन्नर पाच जणात सहा एकर जमीन
- स्वत:कडे 12 तोळे सोने
- पत्नीकडे 20 तोळे सोने
- पत्नीच्या नावे डीमॅट अकाऊंटवर एक ते दोन लाख गुंतवणूक
- पाच बँक खाते
40 कोटी 87 लाखाचे बाजारमूल्य आहे.
अशोक खरातने अमेरिका, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, युएई, दक्षिण आफ्रिका, इथोपिया, टांझानिया, केनिया, इंडोनेशिया, मलेशिया, पेरु, युगांडा, कम्बोडिया या देशांमध्ये प्रवास केल्याची माहिती फडणवीसांनी दिली आहे. तसंच प्रशांत पाळदे आणि किरण कटारिया त्यांचे सीए असल्याची माहिती तपासात समोर आल्याचं सांगितलं आहे.
भोंदू अशोक खरातच्या शिवनिका ट्रस्टमधील आर्थिक व्यवहार वादात सापडलेत. 2018मध्ये ज्या ट्रस्टची उलाढाल चार लाखांची होती त्या ट्रस्टनं 2024मध्ये कोटीच्या कोटी उड्डाणं घेतली. या शिवनिका ट्रस्टचे आर्थिक व्यवहार आता संशयाच्या भोव-यात सापडलेत. ट्रस्टवर असलेले संचालकही आता चौकशीच्या फे-यात सापडण्याची शक्यता आहे. या ट्रस्टच्या माध्यमातून झालेले आर्थिक व्यवहार कुणाशी झाले कसे याचा तपास केला जाणार आहे. ट्रस्टवरील संचालक सीए ललित पोफळेंचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. कारण ट्रस्टची आर्थिक भरभराट कशी झाली याची सगळी माहिती ललित पोफळेंकडं असण्याची शक्यता आहे. ललित पोफळे अशोक खरातच्या आर्थिक व्यवहारांचे राजदार असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या संपुर्ण विषयावर सीए ललित पोफळे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. मात्र, विषय न्याप्रविष्ट असल्याने कॅमेऱ्यासमोर प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिला. फोनवरुन बोलताना सीए ललित पोफळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
"मी पाच वर्षे खरात यांच्या ट्रस्टवर ट्रस्टी म्हणून होतो. ट्रस्टवर एकही सीए नाही. त्यामुळे तुम्ही ट्रस्टवर या अशी विनंती खरात यांनी केली होती. म्हणून मी ट्रस्टी झालो. मागील तीन वर्षात माझे आणि खरात यांचे वैयक्तिक व्यवहार झालेले नाहीत. त्याआधी झालेले असतील तर माझ्या लक्षात नाही. आम्ही धार्मिक माणसं आहोत, म्हणुन तिथे जात होतो. माझ्या किंवा माझ्या कुटुंबियांच्या कंपन्या आणि खरात यांचा ट्रस्ट यांच्यात व्यवहार झालेले नाहीत मी त्यांच्या वतीने आधिकार्यांचे पैसे मॅनेज करत नव्हतो. माझा काहीही संबंध नाही. ट्रस्टचा आयपीओ होत नाही. त्याचा माझा काही संबंध नाही. मी ट्रस्टचा सीए नव्हतो. ट्रस्टचे सीए वेगळे आहेत. मला एसआयटीने अद्याप चौकशीला बोलावले नाही. बोलावले तर जाणार," असं स्पष्टीकरण ललित पोफळे यांनी दिलं आहे.
शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे.
...Read More|
RCB
(20 ov) 240/4
|
VS |
MI
222/5(20 ov)
|
| Royal Challengers Bengaluru beat Mumbai Indians by 18 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
LSG
(20 ov) 164/8
|
VS |
GT
165/3(18.4 ov)
|
| Gujarat Titans beat Lucknow Super Giants by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NAM
(49 ov) 198
|
VS |
SCO
199/3(38 ov)
|
| Scotland beat Namibia by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.