'मला फक्त 2 दिवस द्या, त्यांची कपडे काढून...'; जाहीर सभेत 'झिंग्या'वरुन सुजय विखे-पाटलांचा संताप

Crime News: जाहीर भाषणामध्ये सर्वच पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सुधरण्यास सांगावं असं म्हणताच सुजय विखे पाटलांनी अवघ्या दोन दिवसांचा कालावधी मागत एक विधान केलंय.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 27, 2026, 10:57 AM IST
'मला फक्त 2 दिवस द्या, त्यांची कपडे काढून...'; जाहीर सभेत 'झिंग्या'वरुन सुजय विखे-पाटलांचा संताप
जाहीर सभेत केलं विधान (प्रातिनिधिक फोटो)

Crime News: शिर्डीमध्ये कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही अशा प्रश्न पडण्यासारखी स्थिती दिसून येत आहे. कारागृहातून जामीनावर बाहेर येताच रिल , रॅली काढणं भोवलं शिर्डीतील एका आरोपीला चांगलेच भोवले आहे. जमाव जमवत रॅली काढल्याप्रकरणी आरोपी अनिकेत (झिंग्या) शेजवळविरोधात शिर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र या प्रकारामुळे माजी खासदार सुजय विखे चांगलेच संतापले असून त्यांनी शिर्डी शहरातील गुन्हेगारी आक्रमक भूमिका घेतली आहे. अशाप्रकारे गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या रील रॅली काढणाऱ्या व्यक्तींनी सुजय विखे पाटलांनी इशारा दिला आहे.

Add Zee News as a Preferred Source

'शिर्डीचा किंग आला' अशा घोषणा देत...

रात्रीच्या वेळी शिर्डी शहरात दहशत निर्माण केल्या प्रकरणी पोलिसांनी रील रॅली काढणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 'शिर्डीचा किंग आला' अशा घोषणा देत शहरातून रॅली काढून रिल व्हायरल करत दहशत माजवण्याचा प्रयत्न या आरोपींनी केला होता. शिर्डी पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सागर काळे यांच्या फिर्यादीवरून अनिकेत (झिंग्या)शेजवळ , शुभम घोडे , सतीश लोंढे ,आनंद लोंढे आदींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

आता आम्हाला काम करु द्या

"मला फक्त दोन दिवस द्या, रील रॅली काढणाऱ्यांची कपडे काढून शिर्डीतून वरात काढतो," असं संतापलेल्या सुजय विखे पाटलांनी जाहीर भाषणात म्हटलं आहे. "जनतेच्या आशिर्वादाने कायम आमदार म्हणून राधाकृष्ण विखे पाटीलच राहणार. आता आम्हाला जनतेचे काम करु द्या.  शिर्डी शहरातील माझ्या हितचिंतकांना माझी विनंती आता संयमाने घ्या. कुरघोड्याचे राजकारण आता बंद करा. शिर्डीच्या विकासासाठी सर्वपक्षियांना आपण सोबत घ्यायला तयार  आहोत. आमचा कोणावरही रोष नाही," असं सुजय विखे पाटील म्हणाले आहेत.

'हा सुजय विखेचा शब्द'

पुढे बोलताना गुन्हेगारीविरोधात सर्व पक्षांनी एकत्र यावं असं आवाहनही सुजय विखे पाटलांनी केलं आहे. "गुन्हेगारांविरोधात एकमूठ सर्वपक्षीय लोकांनी करावी. परवा मी सोशल मीडियावर व्हिडिओ बघितला. आरोपी सुटला आणि गाड्यांची रॅली काढली , फक्त दोन दिवस द्या. कपडे काढून रॅली आणि रिल काढणाऱ्यांची वरात शिर्डीतून काढतो. हा सुजय विखेचा शब्द आहे," असं सुजय विखे पाटील म्हणाले.

कार्यकर्त्यांना सुधारायला सांगा

"माझे सर्वांना आवाहन कार्यकर्ता कोणाचाही असो , कोणाच्याही जवळ असो ते लांब करा सुधारायला सांगा. हा तमाशा शिर्डीमध्ये स्वीकारला जाणार नाही , तो कोणीही असो. मतदानासाठी लाचारी पत्करण आम्ही सोडलंय, शिर्डी सुरक्षित राहील. निवडणुकांवेळी जो शब्द आम्ही जनतेला दिलाय तो पूर्ण करणार," असं म्हणत सुजय विखे पाटलांनी कोणालाही सोडणार नाही असा इशाराच दिला आहे.

About the Author

Swapnil Ghangale

स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.

...Read More