महाराष्ट्राच्या राजकारणात हायव्होल्टेज ड्रामा! नाशिकमध्ये गिरीश महाजनांसमोरच मोठा राडा; विरोध असताना भाजपने 'त्या' 5 जणांचा पक्षप्रवेश केला

महाराष्ट्राच्या राजकारणात हायव्होल्टेज ड्रामा पहायला मिळाला. नाशिकमध्ये गिरीश महाजनांसमोरच मोठा राडा; झाला. विरोध असताना भाजपने 'त्या' 5 जणांचा पक्षप्रवेश केला आहे. 

वनिता कांबळे | Updated: Dec 25, 2025, 02:14 PM IST
महाराष्ट्राच्या राजकारणात हायव्होल्टेज ड्रामा! नाशिकमध्ये गिरीश महाजनांसमोरच मोठा राडा; विरोध असताना भाजपने 'त्या' 5 जणांचा पक्षप्रवेश केला

Maharashtra Politics Nashik BJP Controversy :  महाराष्ट्राच्या राजकारणात हायव्होल्टेज ड्रामा पहायला मिळाला आहे. नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोरच मोठा राडा झाला.  विरोध असताना भाजपने 'त्या' 5 जणांचा पक्षप्रवेश केला आहे. नाशिकमध्ये मोठा गोंधळ पहायला मिळत आहे.  महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नाशिकमध्ये भारतीय जनता पार्टीतील वाद चव्हाट्यावर आला आहे. 

Add Zee News as a Preferred Source

नाशिकमध्ये उद्धवसेनेला धक्का देण्याची रणनीती भाजपाने आखली आहे. ठाकरे पक्षाच्या  2 बड्या नेत्यांचा पक्षप्रवेशावरुन वाद झाला. या पक्ष प्रवेशामुळे भाजपात नाराजी पसरली आहे. या दोन्ही नेत्यांच्या पक्षप्रवेशाला आमदार देवयानी फरांदे यांनी विरोध केला. त्याशिवाय काँग्रेसच्या शाहू खैरे यांच्या पक्षप्रवेशालाही विरोध होतोय. त्यामुळे पक्षप्रवेशावरून भाजपात मोठं नाराजीनाट्य रंगलं. त्याचे पडसाद भाजपा कार्यालयात फरांदे समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दोन्ही गट आमनेसामने आल्यानं भाजप कार्यलयाला पोलीस छावणीचं स्वरुप आले.

कार्यकर्त्यांचा विरोध झुगारुन विनायक पांडे, यतीन वाघ,  शाहू खैरे यांच्यासह 5 नेत्यांना भारतीय जनता पार्टीत प्रवेश देण्यात आला आहे. कार्यालयाबाहेर मोठा गोंधल सुरु असताना  नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन  यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला. 

 

About the Author

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे.  याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.

...Read More