Nashik Crime : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण महाराष्ट्रात गाजत आहे. याप्रकरणात दररोज नवंनवीन खुलासे होत आहे. महिलांचे लैंगिक शोषण आणि बलात्कार प्रकरणात अशोक खरात तुरुगांत आहे. या व्यक्ती भोंदूगिरीच्या नावाखाली महिलांच नाही तर व्यावसायिकांनाही लुटलं आहे. त्यांची गुन्हेगारी जगातील कारनामे तपासात समोर येत आहे. अशातच नाशिकमध्ये अजून एका अशोक खरात पार्टन 2 समोर आलं आहे. सातपूरमधील व्यावसायिकाचा टॅब चोरीला गेला होता. ज्यात 200 हून अधिक अश्लील व्हिडीओ सापडले आहेत. पोलिसांनी या प्रकरणात महिलांना समोर येऊन गुन्हा दाखल करण्याचे आवाहन केलं होतं. त्यानंतर त्या व्यावसायिकावर पहिला गुन्हा दाखल झाला आहे.
नाशिकच्या सातपूर परिसरामध्ये एका बड्या व्यावसायिकाचे आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत त्याच्याकडून 12 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. याप्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी त्या चार चोरांना अटक केली. त्यानंतर पोलिसांना या अश्लील व्हिडीओमागे काहीतरी दडलंय अशा संशय आला होता. त्यांनी तपास सुरु ठेवला आणि महिलांना पुढे येण्याचे आवाहन केलं. त्यानंतर एका महिलेने व्यावसायिक आणि एनजीओ संचालक यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. उद्योजक आणि एनजीओ संचालकाकडून 100 हुन महिलांचे लैंगिक शोषण झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.
संशयित आरोपी रवींद्र एरंडे (वय 63) ला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. गरजू महिलांचे आक्षेपार्य व्हिडीओ बनवून लैंगिक शोषण केल्याप्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल करणाऱ्या या व्यावसायिका विरोधातच पीडित महिलेकडून पहिला गुन्ह्याची नोंद झली आहे. टॅबमध्ये पोलिसांना 87 आक्षेपार्ह व्हिडीओ सापडले त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. पोलिसांनी 4 मोबाईल, 2 पेनड्राईव्ह, 1 मेमरी कार्ड जप्त केली आहेत. गरजू महिलांना नोकरीचे आमिष दाखवून शोषण केल्याचा आरोप व्यावसायिक रवींद्र एरंडे यांच्यावर करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक आणि इगतपुरीतील हॉटेलमध्ये अत्याचार करुन तो गुपचूप चित्रीकरण करायचा. त्यानंतर या व्हिडीओच्या माध्यमातून तो गरजू महिलांना त्रास देत असे. एवढंच नाही तर अश्लील व्हिडीओ ‘ब्लू फिल्म’ स्वरूपात विक्रीचा देखील संशय पोलिसांना आहे. त्यादिशेने पोलीस पुढचा तपास करत आहेत. महिलांना ब्लॅकमेलिंगद्वारे पैशांची मागणी झाली का या बाबत देखील पोसीस तपास करत आहेत. चौकशी दरम्यान असं समोर आलं की, पीडितांमध्ये अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, कंपनी कामगार आणि घरकाम करणाऱ्या महिलांचा समावेश आहे. आरोपीवर बलात्कार आणि ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आला आहे. प्रकरणातील इतर स्पॉट्स आणि लिंकचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. आता या तपासातून अजून काय काय समोर येतं हे पाहावं लागलं.
नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे.
...Read More|
KKR
(20 ov) 181/4
|
VS |
LSG
182/7(20 ov)
|
| Lucknow Super Giants beat Kolkata Knight Riders by 3 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
GT
(20 ov) 210/4
|
VS |
DC
209/8(20 ov)
|
| Gujarat Titans beat Delhi Capitals by 1 run | ||
| Full Scorecard → | ||
|
OMA
(20 ov) 163/7
|
VS |
SCO
151/9(20 ov)
|
| Oman beat Scotland by 12 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.