Ashok Kharat Update : भोंदूबाबा अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांची यादी संपता संपत नाही. त्यात दिवसेंदिवस भर पडत असताना दिसतेय. SIT तपासादरम्यान खरातचा आणखी एक कारनामा समोर आलाय. खरात हवाला रॅकेट चालवत असल्याची सूत्रांची माहिती आहे. हे सर्व काम मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमधून चालत असल्याची माहिती आहे. पंचतारांकित हॉटेलमध्ये विशेष सूट वर्षभर बुक असायचा अशी ही माहिती आहे.
भोंदू खरातकडून शोषण झालेल्या पीडित महिला प्रचंड मानसिक धक्क्यात असल्याची माहिती आहे. यातील 8 ते 9 पीडित महिलांनी मानसोपचार तज्ज्ञांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. गेल्या काही दिवसांपासून तणावपूर्ण घटनाक्रम आणि सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होण्याच्या भीतीने बळी ठरलेल्या पीडितांना आता आपल्याच घरात तोंड लपवून राहावे लागत असल्याने नैराश्य आणि मानसिक त्रासाचा सामना करावा लागत आहे. पीडित महिलांना पोलिसांनी पूर्णपणे विश्रांती घेण्याचा आणि कोणत्याही मानसिक दडपणापासून लांब राहण्याचा सल्ला दिला आहे. न्यायासाठी लढताना होणारा मानसिक छळ हा शारीरिक जखमांपेक्षा खोल आहे. तपासी पथकाकडून महिलांना अज्ञात स्थळी बोलावून चौकशी केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. पीडित महिलांना आतून चुकीचे वाटते, पण लगेच मन दुसरीकडे वळते, इतके दिवस विश्वास ठेवला मग चुकीचे कसे असेल, हा अंतर्गत संघर्ष महिलांना अडकवून ठेवतोय.
भोंदू अशोक खरातभोवती चौकशीचा फास अधिक घट्ट झालाय. सलग 16व्या दिवशी अशोक खरातची एसआटीनं चौकशी केलीय. खरातची 10 तासांहून अधिक वेळ चौकशी झालीये. काही डॉक्टर्स आणि अशोक खरातला समोरासमोर बसवून चौकशी केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. औषधं कशाप्रकारे पुरवली जात होती, याची माहिती एसआयटीनं जाणून घेतलीय. या चौकशीत डॉक्टरांचा सहभाग उघड झाला तर नाशिकमधल्या काही डॉक्टर्सवरही लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे.
भोंदू अशोक खरातला जमिनीच्या व्यवहारात मदत करणारे नाशिक, पुणे, अहिल्यानगर जिल्ह्यातील महसूल विभागातील काही अधिकारी तसेच प्लॉट, फ्लॅट विक्री व्यवसायातील काही संशयित ब्रोकर एसआयटीच्या रडारवर असून यातील एका ब्रोकरची चौकशी करण्यात आलीये. प्रांरभीपासूनच खरात प्रकरणात प्रॉपर्टी रॅकेटचा संशय बळावला होता. या रॅकेटमधील प्रत्येक कड़ी तपासली जात आहे. पुढच्या टप्प्यात अजून काही ब्रोकर्सला चौकशीसाठी बोलविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 60 लाखांची जमीन 22 लाखांत बळकावल्याचा जो गुन्हा भोंदू खरातवर दाखल झाला त्यात ब्रोकरच्या माध्यमातून खरातची फिर्यादीशी ओळख, जमिनीचा व्यवहार पार पडल्याची उघड झाले होते. यापूर्वीच्या दोन गुन्ह्यातही जमीन विक्रीचे असे व्यवहार खरातने केल्याचे उघड झाल्याने अनेक ब्रोकर तसेच शासनातील अधिकारी खरातला मदत करीत होते का? असा संशय आहे. अशोक खरातवर आतापर्यंत 12 गुन्हे दाखल झाले आहेत. अशोक खरात प्रकरणात अनेक राजकीय नेते तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांची नावे देखील समोर आलीये.
दरम्यान, भोंदू अशोक खरात याचा मुलगा हर्षवर्धन खरात फरार झाल्याची माहिती सूत्रांची दिली आहे. एसआयटीची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता हर्षवर्धन खरात नाशिक शहरातून फरार झाल्याच समोर आलं आहे. शिवाय हर्षवर्धन खरात याचा मोबाईल बंद असल्याने अधिकारी तृप्तबाला निवासस्थानी पोहोचले होते, मात्र तो त्या ठिकाणी मिळाला नाही त्यामुळे पोलिसांनी त्याचा शोध घेणे सुरू केलंय. शिर्डी पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर भोंदू अशोक खरातची पत्नी कल्पना खरात देखील फरार असल्याचे समोर आलंय.
नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे.
...Read More
LIVE|
SRH
219/6(20 ov)
|
VS |
PBKS
120/2(9.3 ov)
|
| Full Scorecard → | ||
|
RCB
(20 ov) 201/8
|
VS |
RR
202/4(18 ov)
|
| Rajasthan Royals beat Royal Challengers Bengaluru by 6 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
OMA
(50 ov) 218/9
|
VS |
NAM
223/9(49.3 ov)
|
| Namibia beat Oman by 1 wicket | ||
| Full Scorecard → | ||
|
KKR
(20 ov) 181/4
|
VS |
LSG
182/7(20 ov)
|
| Lucknow Super Giants beat Kolkata Knight Riders by 3 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.