Raj Thackeray Shiv Shakti Rally Nashik : महापालिका निवडणूक प्रचारासाठी ठाकरे बंधूंची पहिली संयुक्त सभा नाशिकमध्ये आयोजीत करण्यात आली. ठाकरे ब्रँडची महाराष्ट्रातील पहिली जाहीर सभा हाऊसफुल ठरली. निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची शिवसेना आणि मनसे पक्षाला मोठी गळती लागली आहे. अनेक नेत्यांनी पक्ष सोडला आहे. यामुळे ठाकरे बंधूंना धक्क्यावर धक्के बसत आहेत. राज ठाकरे यांनी जाहीर सभेत एका वाक्यात पक्ष सोडून जाणाऱ्यांचा जाहीर समाचार घेतला.
निवडणुका घ्यायला इतकी वर्ष का लागली? चार वर्षाहून अधिक वेळ का लागला? याचे उत्तर सरकारने दिले पाहिजे. अत्यंत चुकीच्या पद्धतीने कॅरम सुटला आहे. कोणाच्या सोंगट्या कोणाच्या भोकात काहीच कळत नाही. रोज विचारवे लागते. आज कुठे अस म्हणत राज ठाकरे यांनी पक्ष बदलणाऱ्यांचा समाचार घेतला. छाननीच्या वेळी एकाने AB फॉर्म गिळला. निवडणुका कोणत्या थराला गेल्या आहेत? सत्ताधारी पक्षाचे 70 नगरसवेक बिनविरोध निवडणून येतात. तिथल्या लोकांना मतदानाचा तरी अधिकार द्या अस म्हणत राज ठाकरे यांनी संतपा व्यक्त केला.
52 साली जन्माला आलेला पक्ष दुसऱ्याची पोर का कडेवर घेऊन फिरत आहेत. सतत काम करणाऱ्या कार्यकर्त्याला डावलून बाहेरून माणसे आणली जात आहेत त्यांना उमेदवारी का देतात ? कार्यकर्त्यांना शून्य किंमत. दुसऱ्या पक्षातील माणस घेऊन त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवता. भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांचा हा अपमान आहे. एका प्रभागातील तीन जणांना पंधरा कोटीची ऑफर झाली. कुठून येतायेत पैसे. एकतर उभे राहू द्यायचे नाही आणि दहशत करायची अशा वातावरणात निवडणुका घेत आहेत.
लाकूडतोड्या बरा होता.. सोन्या चांदीची कुऱ्हाड सोडून त्याने आपलीच कुऱ्हाड घेतली. या माणसाने पक्षातील लोक कापली आणि बाहेरून झाडे आणून पक्षात लावतायत. देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक शहर दत्तक घेतले. मात्र बाप फिरकलाच नाही. नाशिकला सावत्र मुलापेक्षा वाईट वागणूक दिली. आम्ही सत्तेत होतो त्यावेळी यशस्वी कुंभेमळा झाला.एकही झाड कापले नाही. आता का झाडे कापली जात आहेत. साधू महंतांनी परदेशात सुद्धा प्रशंसा केली गेली.
झाडे तोडून आता कुंभमेळा करायचा त्यानंतर जमीन व्यावसायिकांच्या घश्यात घालायचा डाव आहे. आम्ही सत्तेत असताना येणाऱ्या पन्नास वर्षाचा पाण्याचा प्रश्न सोडविला. घंटागाडी सुरू केली. घनकचरा प्रकल्प सुरू केला. बोटनीकल गार्डन सुरू केले. 4 5 कोटींचा प्रकल्प. 14 ते 15 कोटी टाटा यांनी खर्च केले. संग्रहालय, वॉटर कंरटन सर्व उध्वस्त केले. 700 कोटींची कर्ज मुक्त महापालिका केली. विरोधकांनी एकही भ्रष्टाचाराचा आरोप केला नाही. खड्ड्यात उभा करून मारीन असा इशारा दिल्याने ठेकेदाराला रस्ते चांगले केले.
सिलेंडर हजार रुपये झाले आहे. येणारी पिढी काय म्हणेल बाप विकला गेला आईने पैसे घेतले. परदेशात शिकण्यासाठी आणि नोकरीसाठी जात आहेत कारण सर्व काही बकाल होत आह. अशा लोकांच्या हातात शहरे देणार आहात का? अदानी टाटा अंबानी सारखी लोक मी आणली त्यांना काम करण्याची संधी दिली नाही आणि बोगस लोकांना संधी दिली. पैसे वाटणाऱ्यांना निवडून देणार असाल तर भवितव्य अंधकारमय. मनसे सेना total आकडा 100 हवा मला.. पुन्हा एक संधी द्या असे आवाहन राज ठाकरे यांनी केले.
वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात. यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.
...Read More|
ENG
(97.3 ov) 384 (88.2 ov) 342
|
VS |
AUS
567(133.5 ov) 161/5(31.2 ov)
|
| Australia beat England by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
AUS
(45.2 ov) 152 (34.3 ov) 132
|
VS |
ENG
110(29.5 ov) 178/6(32.2 ov)
|
| England beat Australia by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
IND
(20 ov) 231/5
|
VS |
SA
201/8(20 ov)
|
| India beat South Africa by 30 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.