ठाकरेंच्या युतीनंतर दुपारी गुलाल उधळत नाचणारा महापौर दिवस संपताच भाजपात; पण पक्षप्रवेशाआधी मोठा ट्विस्ट

Nashik Former Mayor to Join BJP: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीनंतर राज्यात अनेक मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. दरम्यान भाजपाने दुसऱ्याच दिवशी उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे.   

शिवराज यादव | Updated: Dec 25, 2025, 12:34 PM IST
ठाकरेंच्या युतीनंतर दुपारी गुलाल उधळत नाचणारा महापौर दिवस संपताच भाजपात; पण पक्षप्रवेशाआधी मोठा ट्विस्ट

Nashik Former Mayor to Join BJP: मनसे आणि शिवसेनेच्या युतीनंतर राज्यातील राजकीय वातावरण बदललं आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने पालिका निवडणुकीतील चुरस वाढली असताना, अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे. दरम्यान उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला असून, त्यांचा माजी महापौर भाजपाच्या गळाला लागला आहे. ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेनंतर दुपारी गुलाल उधळत नाचणारा हा नेताच पक्ष सोडून जात असल्याने खासदार संजय राऊत यांनीही आश्चर्य व्यक्त केलं आहे. 

Add Zee News as a Preferred Source

नाशिकमध्ये तीन पक्षप्रवेश, उद्धव ठाकरे-काँग्रेसला धक्का

नाशिकचे दोन माजी महापौर भाजपच्या गळाला लागले आहेत. माजी महापौर विनायक पांडे, यतिन वाघ हे दोन्ही नेते भाजपात प्रवेश करणार आहेत. विनायक पांडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे (Shivsena UBT) दिग्गज नेते आहेत. याशिवाय काँग्रेसचे शाहू खैरे हेदेखील भाजपात प्रवेश कऱणार आहेत. 

भाजपाचे कार्यकर्ते संतापले, नेते नाराज

मात्र या पक्षप्रेवशामुळे भाजपामध्ये नाराजीचे वारे वाहू लागले आहेत. हिंदुत्वाच्या तत्वाविरोधात प्रवेश दिले जात असल्याने नेतृत्वविरोधात नाराजी व्यक्त होत आहे.  निवडणूक प्रमुख आमदार देवयानी फरांदे यांनी तर फेसबुकला पोस्ट शेअर करत नाराजी बोलून दाखवली आहे. भाजप कार्यालयाबाहेर पक्षनिष्ठा असलेल्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली असून, आपली नाराजी बोलून दाखवली आहे. प्रवेश दिल्यास भाजपमध्ये दुफळी निर्माण होऊ शकते. 

आमदार देवयानी फरांदे यांची फेसबुक पोस्ट

“प्रभाग क्रमांक १३ मध्ये होणाऱ्या आजच्या प्रवेशाला माझा स्पष्ट विरोध आहे. तसेच प्रस्थापितांच्या विरोधात ठामपणे लढा देणाऱ्या हिंदुत्ववादी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मी खंबीरपणे पाठीशी आहे. सदर विषयाबाबत निवडणूक प्रमुख म्हणून मला कोणतीही विचारणा करण्यात आलेली नाही,” असं आमदार देवयानी फरांदे यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे. 

संजय राऊतांनीही व्यक्त केलं आश्चर्य

युतीची घोषणा झाल्यानंतर दुपारी 1 वाजेपर्यंत नाचत होते. मलाही आश्चर्य वाटत आहे. काल दुपारपर्यंत गुलाल उधळत, भगवा हवेत फिरवत शिवसेना-ननसे युती झाली म्हणून हे लोक जल्लोष करत होते. कसा कोणवार विश्वास ठेवायचा अशी खंत संजय राऊतांनी व्यक्त केली आहे. 

About the Author

Shivraj Yadav

शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी  टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे. 

...Read More