सत्तास्थापनेसाठी नवी समीकरणं? इस्लाम पार्टीची, शिवसेना, एमआयएमला साद, हिंदुत्ववादी शिवसेना इस्लाम पार्टीला पाठिंबा देणार?

महापालिकांचे निकाल लागताच आता सत्तास्थापन करण्याच्या घडामोडींना वेग आलाय. मालेगावात इस्लाम पार्टीनं सर्वाधिक जागा जिंकून सर्वांना धक्का दिलाय.. 35 जागा जिंकलेल्या इस्लाम पार्टीला बहुमताचा जादुई आकडा गाठण्यासाठी इतर पक्षांच्या पाठिंब्याची गरज लागणार आहे.

वनिता कांबळे | Updated: Jan 20, 2026, 12:02 AM IST
सत्तास्थापनेसाठी नवी समीकरणं? इस्लाम पार्टीची, शिवसेना, एमआयएमला साद, हिंदुत्ववादी शिवसेना इस्लाम पार्टीला पाठिंबा देणार?

Nahik Malegone Islam Party : निकाल लागताच आता लगबग सुरू झाली ती सत्तास्थापनेची.. ज्या ठिकाणी स्पष्ट बहुमत नाही तिथे कुणाचा पाठिंबा घ्यायचा, कुणाचा नाकारायचा यावर चर्चा झडू लागल्यात. गेल्या दोन चार वर्षांतला राज्याच्या राजकारणातला इतिहास पाहता, सत्तेसाठी कुठलं समीकरण कसं जुळून येईल, हे कुणीही सांगू शकत नाही.. मालेगावमध्ये तशीच स्थिती सध्या पाहायला मिळते. इस्लाम आणि समाजवादी पार्टीच्या मालेगाव सेक्युलर फ्रंटनं बहुमतासाठी लागणारी 43 ही मॅजिक फिगर गाठण्यासाठी हालचाली सुरु केल्यात. त्यासाठी त्यांनी कट्टर विरोधातल्या शिवसेनेसह एमआयएमकडे बिनशर्त पाठिंबा देण्यासाठी प्रस्ताव पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. एकदा महापालिकेचा निकालावर नजर टाकली तर चित्र स्पष्ट होईल.

बहुमत आमच्याकडे असल्यामुळे महापौर आमचाच बनला पाहिजे, शहराच्या विकासासाठी, हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी आमचे दरवाजे खुले राहतील, असं मत इस्लाम पार्टी प्रमुख, माजी आमदार असिफ शेख यांनी व्यक्त केलं. हिंदुत्वाचा मुद्दा प्रखरपणे मांडणा-या शिंदेंची शिवसेना इथं किंगमेकरच्या भूमिकेत आहे.  त्यामुळे प्रस्तावावर बोलताना शिवसेनेचे आमदार दादा भुसेंनी याबाबत वरीष्ठ निर्णय घेतील, असं म्हटलंय.  तर दुसरीकडे इस्लाम पार्टीचे कट्टर विरोधक  असणा-या MIM पक्षानं विकासाच्या मुद्द्यावर आम्ही पाठिंबा देऊ, मात्र चर्चा आवश्यक आहे, असं मत MIM चे आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी व्यक्त केलं.

एकंदरीत मालेगावचे राजकीय समीकरण नेहमीच शिवसेनेभोवती फिरत आलंय. शिवसेना सत्तेत आहे. त्यामुळे भुसेंच्या माध्यमातून मालेगाव शहराच्या विकासासाठी महानगरपालिकेत भरघोस निधी, विकासकामं केली जातील, हे लक्षात घेता इस्लाम पार्टी शिवसेनेनं सत्तास्थापन करण्याबाबत उत्सुक असल्याचं समजतं. पण हिंदुत्वाचा मुद्दा सोडून विकासाच्या मुद्द्यावर शिंदेंची शिवसेना इस्लाम पार्टीसोबत सत्तेत बसते. बिनशर्त पाठिंबा देते का.. की एमआयएम मतभेद विसरून विकासासाठी हात पुढे करते, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
 

About the Author

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे.  याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.

...Read More