वडील त्यांच्या गर्लफ्रेंडला घरी घेऊन यायचे; मुलाला हे सगळं पहावलं नाही, त्याने असं काही केलं की कुणी विचारही करणार नाही

Nashik Crime: नाशिकमधून एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. वडीलांचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते. तिला घरी आणण्यावरून रोज वाद व्हायचे. या त्रासाला कंटाळून मुलाने थेट जीवन संपवल्याची घटना उघडकीस आली आहे.     

मनाली सागवेकर | Updated: Apr 5, 2026, 07:33 PM IST
वडील त्यांच्या गर्लफ्रेंडला घरी घेऊन यायचे; मुलाला हे सगळं पहावलं नाही, त्याने असं काही केलं की कुणी विचारही करणार नाही

विशाल मोरे, झी मीडिया, नाशिक: नाशिकमधून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. पोलीस ठाणे हद्दीतील करंभेळ कनाशी गावात कौटुंबिक वादातून एका मुलाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.  वडिलांच्या अनैतिक संबंधांमुळे त्रस्त झालेल्या तरुणाने टोकाचे पाऊल उचलत थेट जीवनच संपवले. मृतक सचिन हेमराज चव्हाण या अवघ्या 21 वर्षाच्या तरुणाने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली आहे. अभोणा पोलीस ठाण्यात या घटनेचा तपास वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. काय आहे ही संपूर्ण घटना जाणून घेऊया. 

Add Zee News as a Preferred Source

वडीलांचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध

दरम्यान, सचिनचे वडील हेमराज चव्हाण यांचे गेल्या कित्येक महिन्यांपासून एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. या महिलेला घरी आणण्याच्या मुद्द्यावरून घरात सतत वाद होत होते. या वादातून वडिलांकडून सतत मारहाण, शिवीगाळ आणि दमदाटी होत असल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. तसेच सचिन आणि त्याच्या भावाने मिळून त्यांच्या शेतात पिकवलेल्या कांद्याची त्यांच्या वडीलांनी परस्पर बाजारात विकून टाकला. यामुळेही त्यांच्यात अधिक वाद झाले. 

सततच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

पुढे हे वाद इतक्या विकोपाला गेले की या सततच्या त्रासाला कंटाळून सचिनने आत्महत्या केली. अशी माहिती सचिनचा भाऊ शुभम हेमराज चव्हाण जो अवघ्या 19 वर्षाचा आहे, याने तक्रारीमध्ये दिली आहे. या फिर्यादीवरुन अभोणा पोलीस ठाण्यात वडील आणि संबंधित महिलेविरूद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास वरिष्ठ पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाने अभोणा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक डी बी शिरोळे हे करीत आहे. या घटनेमुळे पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे. 

संपूर्ण गावात उडाली खळबळ 

आजकाल महाराष्ट्रातून यांसारख्या घटनेच्या बातम्या अधिक प्रमाणात समोर येत आहेत. नाशिकमध्ये घडलेली ही घटना वडील आणि मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना आहे. वडील हेमराज चव्हाण यांना पोटच्या मुलापेक्षा केवळ काही दिवसांची ओळख असलेली गैर महिला महत्त्वाची होती. त्यांच्या या हट्टापाई 21 वर्षीय सचिनने त्याचे जीवनच संपवले. या घटनेमुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे. 

About the Author

Manali Sagvekar

सध्या 'झी 24 तास डिजिटल'मध्ये कॉन्टे्ट रायटर म्हणून इंटर्नशिप करत आहे. याआधी 'सकाळ मीडिया' ग्रुपमध्ये (जानेवारी २०२४ - एप्रिल २०२४) एंटरटेनमेंट बीटचा भाग म्हणून इंटर्नशिप केली आहे, जिथे मराठी मनोरंजन बातम्या, सेलिब्रिटी अपडेट्स आणि डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी जीवनशैली सेक्शनमध्ये कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. नंतर, 'साम टीव्ही मराठी'मध्ये (जुलै २०२५ - सप्टेंबर २०२५) डिजिटल न्यूजरूम (लाइफस्टाइल बीट) मध्ये देखील इंटर्नशिप केली, जिथे मराठीमध्ये आकर्षक जीवनशैली कॉन्टेन्ट तयार केले, CMS आणि Google Workspace सह काम करायला शिकले आणि डिजिटल सामग्री वर्कफ्लोमध्ये अनुभव मिळवला.

...Read More