10 KM लांब पर्यंत वाहनांच्या रांगा, भयानक ट्राफिक जाम; नाशिक मुंबई आग्रा महामार्ग पूर्णपणे ठप्प, हजारो वाहने जागच्या जागी थांबली

नाशिक मुंबई आग्रा महामार्ग ठप्प झाला आहे. या महामार्गावर  10 KM लांब वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.   

वनिता कांबळे | Updated: Jan 26, 2026, 06:19 PM IST
10 KM लांब पर्यंत वाहनांच्या रांगा, भयानक ट्राफिक जाम; नाशिक मुंबई आग्रा महामार्ग पूर्णपणे ठप्प, हजारो वाहने जागच्या जागी थांबली

Nashik Mumbai Agra Highway Traffic Jam : नाशिक मुंबई आग्रा महामार्ग पूर्णपणे ठप्प झाला आहे. नाशिक मुंबई आग्रा महामार्गावर 10 KM लांब पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.  हजारो वाहने जागच्या जागी थांबली आहेत. हजारो प्रवासी यात अडकले आहेत. भयानक ट्राफिक जाममुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहेत.  

Add Zee News as a Preferred Source

आपल्या विविध मागण्यांसाठी नाशिकहून लाल वादळ  मुंबईच्या दिशेने कूच करत आहेत.  मात्र, याचा परिणाम सध्या वाहतूकीवर झाला आहे.  या मोर्चामुळे नाशिक मुंबई महामार्ग पूर्ण ठप्प झाला आहे.  मुंडेगाव पासून तर विल्होळी पर्यंत दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. वाहनधारकांना या वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसत आहे. सोमवारी दुपारपासूनच दीड ते दोन तासांपेक्षा जास्त वेळ वाहतूक कोंडीत अडकल्याचे नागरिकांनी सांगितले. 

मुंबईला निघालेल्या या लॉंग मार्च मध्ये तब्बल वीस ते पंचवीस हजार मोर्चेकरी सहभागी झाले आहेत. मुंबईत प्रवेश करण्याच्या अगोदरच या मोर्चाचा फटका आता बसताना पाहायला मिळत आहे.   गिरीश महाजन यांच्यासोबत मोर्चा करांच्या शिष्ट मंडळाची चर्चा झाली मात्र या चर्चेत कुठलेही ठोस असा आश्वासन न मिळाल्याने उद्या मुंबईत शिस्त मंडळाची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे.  या बैठकीत निर्णय लागतो का नाही हे पाहावं लागणार असलं तरी हे लाल वादळ मुंबईच्या दिशेने कूच करणार आहे. मात्र ह्या मोर्चाचा फटका आता सध्या जाणू लागलेला आहे नाशिक मुंबई महामार्ग पूर्णपणे ठप्प झाले असून वाहनांना एक ते दीड तास एकाच जागे वाहन थांबवण्याची वेळ आली आहे. 

 

About the Author

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे.  याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.

...Read More