'स्वप्निल-मुक्ता' पुन्हा एकत्र !

‘मुंबई-पुणे-मुंबई’च्या यशानंतर पुन्हा एकदा सतीश राजवाडे मुक्ता बर्वे आणि स्वप्निल जोशी यांना घेऊन प्रेक्षकांसमोर दाखल झाले आहेत. मात्र यावेळी आपल्याला हे पाहायला मिळणार आहे ते स्मॉल स्क्रीनवर.

Updated: Jan 3, 2012, 05:18 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

मुक्ता बर्वे-स्वप्निल जोशीच्या नव्या सिरीयलचे प्रोमोज गेले कित्येक दिवस आपण टीव्हीवर पहातोय. पण या मालिकेत नक्की काय असणार, ही मालिका नक्की कशी असणार, असे अनेक प्रश्नही तुम्हाला पडले असतील ना. तुमची उत्सुकता जास्त ताणून धरत नाही.. ‘गुंतता हृदय हे’ या मालिकेच्या यशानंतर सतीश राजवाडे पुन्हा एकदा एक नवी रोमॅण्टिक मालिका घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येतायेत.. ‘एक लग्नाची दुसरी गोष्ट’...

 

प्रोमोतल्या स्वप्निल जोशी आणि मुक्ता बर्वे यांच्या जोडीनं ही उत्सुकता जास्त ताणून धरलीय. ‘मुंबई-पुणे-मुंबई’च्या यशानंतर पुन्हा एकदा सतीश राजवाडे मुक्ता बर्वे आणि स्वप्निल जोशी यांना घेऊन प्रेक्षकांसमोर दाखल झाले आहेत. मात्र यावेळी आपल्याला हे पाहायला मिळणार आहे ते स्मॉल स्क्रीनवर.

 

ही एक कौटुंबिक, हलकीफुलकी मालिका आहे. मोहन जोशी, विनय आपटे, स्पृहा जोशी  इ. कलाकारांची मांदियाळी या मालिकेत पहायला मिळणार आहे...

 

त्यामुळे टेलिव्हिजनवरच्या सासू-सुनेच्या रटाळ मालिकांमधून थोडासं का होईना निखळ मनोरंजन ही मालिका करेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही.