झी २४ तास वेब टीम, बारामती
ऊस दरवाढीवर तोडगा निघत नसल्यानं शेतक-यांचं आंदोलन चिघळतच चाललंय. बारामतीच्या शेतकरी कृती समितीच्या आज शहर बंदची हाक दिलीय.
शेतक-यांच्या विविध संघटना आज राज्यभरात चक्काजाम आंदोलन करणार आहेत. त्यामुळं राज्यातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक बंद राहण्याची शक्यता आहे. यासाठी शेतकरी संघटनांचे राज्यभरातील कार्यकर्ते रस्त्यावर उतरुन रास्ता रोको करणार आहेत. त्यामुळं आज तोडगा निघाला नाही तर ऊस दरवाढीचं आंदोलन आणखीनंच चिघळण्याची शक्यता आहे