पालिका निवडणुकीत प्रस्थापितांचे गड शाबुत

नगरपालिका निवडणुकीच्या दुस-या टप्प्यात प्रस्थापितांनी आपले गड राखलेत. सांगली जिल्ह्यात इस्लामपूरमध्ये ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी 23 जागा जिंकत विरोधकांना दणका दिलाय.

Updated: Dec 15, 2011, 03:31 AM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

नगरपालिका निवडणुकीच्या दुस-या टप्प्यात प्रस्थापितांनी आपले गड राखलेत. सांगली जिल्ह्यात इस्लामपूरमध्ये ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी 23 जागा जिंकत विरोधकांना दणका दिलाय.

 

 

जयंत पाटील यांना शह देण्यासाठी सर्वपक्षीय विकास आघाडीची स्थापना केली होती. मात्र त्यांना केवळ 2 जागा मिळाल्या. आष्ट्यातही राष्ट्रवादीनं सर्वच्या सर्व 19 जागा जिंकल्या. गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्या तासगावमध्ये राष्ट्रवादीने 19 पैकी 16 जागा जिंकल्या. अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर आणि श्रीरामपूर, शिर्डीचा गड काँग्रेसनं राखलाय.
अकोला आणि अमरावतीत अनेक ठिकाणी स्थानिक आघाड्यांनी विजय मिळवलाय. चंद्रपूरच्या बल्लारपूरमध्ये सत्तेसाठी चुरस राहणार आहे. इशं राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपनं प्रत्येकी 11 जागा जिंकल्यात. त्यामुळं चार जागा जिंकलेला बसप इशं किंगमेकरच्या भूमीकेत आहे. मराठवाड्यात उस्मानाबादमध्ये पद्मसिंह पाटील यांना यश मिळालय. तर तूळजापूरात काँग्रेसचे मंत्री मधुकर चव्हाण यांना धक्का बसलाय.